Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांच्या मागण्यांवर तात्काळ निर्णय घ्या, अजितदादांच्या आमदाराचे CM ला पत्र !

Maratha Reservation Manoj Jarange Patil : राज्य सरकार मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागणार नाही, तोपर्यंत या सरकारवर विश्वास ठेवणार नाही.सरकारनं आम्हाला प्रत्येकवेळी वेठीस धरलं..
Prakash Solanke- Eknath Shinde
Prakash Solanke- Eknath ShindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalna News : मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची तब्बेत खालावत चालली आहे. यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत. मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रकाश सोळंके हे आमदार आहेत. गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट तयार झाले. त्यावेळी सोळंके यांनी अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या उपोषणाची दखल घेत तातडीने त्यावर तोडगा काढावा, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. मराठा समाजाने यापूर्वी मागणी केल्याप्रमाणे राज्य सरकारने आरक्षण देऊन त्याची अंमलबजावणी करावी, यासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

Prakash Solanke- Eknath Shinde
Manoj Jarange: मनोज जरागेंची प्रकृती खालावली; मराठा समाज आक्रमक;... रस्त्यावर उतरणार

अंतरवली सराटी या आपल्या गावी जरांगे पाटील उपोषणाला बसले असून त्यांच्या आंदोलनाचा बुधवारी पाचवा दिवस आहे. उपोषण सुरु केल्याने जरांगे यांची तब्बेत खालावत चालली आहे. या उपोषणाची दखल राज्य सरकारकडून (State Goverment) घेतली जात नसल्याने तसेच यावर राज्य सरकार कोणतीही भूमिका घेत नसल्याने मराठा समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत.

परिणामी राज्य सरकारबद्दलचे मत दुषित होत चालले आहे. त्यामुळे या आंदोलनाची दखल घेत जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांविषयी तात्काळ निर्णय घ्यावा. हे उपोषण सोडवावे, अशी मागणी आमदार सोळंके यांनी केली आहे.

Prakash Solanke- Eknath Shinde
Manoj Jarange Patil :...अन्यथा 'करेक्ट' कार्यक्रम करू; जरांगे-पाटलांचा इशारा कुणाला?

सगेसोयऱ्याच्या अंमलबाजवणीला राज्य सरकारला 5 महिने वेळ लागतो का? असा प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केला आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागणार नाही, तोपर्यंत या सरकारवर विश्वास ठेवणार नाही.सरकारनं आम्हाला प्रत्येकवेळी वेठीस धरलं आहे.

10 महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. आम्ही शेतकरी, गरीब लोक आहोत. सरकार आमचा किती दिवस छळ करतेय, ते पाहू. अन्यथा या सरकारचा 'करेक्ट' कार्यक्रम करू," असा इशारा देखील जरांगे-पाटलांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com