Maratha Reservation : अण्णा बनसोडे, श्रीरंग बारणेंची झाकली मूठ...‘तो’ मोठा निर्णय घेण्याची वेळच आली नाही!

Pimpri Chinchwad News : मराठा आरक्षण प्रश्नावरून राजीनामा देण्याची तयारी दाखवलेल्या आमदार, खासदारांना मनोज जरांगे यांच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
Anna Bansode-Srirang Barne
Anna Bansode-Srirang Barne Sarkarnama

Pimpri News : मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी अखेर निवृत्त न्यायाधीशांचा समावेश असलेल्या सरकारी शिष्टमंडळाच्या विनंतीनंतर आपले आंदोलन स्थगित केले. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेसह सर्वच बाजूंनी अडचणीत आलेल्या राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला. तसाच तो या प्रश्नावरून राजीनामा देण्याची तयारी दाखवलेल्या आमदार, खासदारांनाही मिळाला. त्यांची झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली आहे. (Maratha Reservation : There was no time for Anna Bansode, Srirang Barne to decide to resign)

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेल्या ४० दिवसांच्या मुदतीतही ते न मिळाल्याने दुसऱ्या टप्यात हे आंदोलन तीव्र झाले. साखळी उपोषणं राज्यभर सुरू झाली. त्यानंतर पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली. शेवटी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, आमदार, खासदारांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली होती. काही आमदार, खासदारांनी मात्र ‘आम्हीही राजीनामा देण्यास तयार आहोत,’ असे सांगितले होते. प्रत्यक्षात तो त्यांनी दिला नव्हता. तसाच एकाही मंत्र्यांने तो दिला नव्हता वा देण्याची तयारीसुद्धा दाखवली नव्हती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Anna Bansode-Srirang Barne
Gram Panchayat Election : ‘काय झाडी...काय डोंगार’फेम शहाजीबापू भावकीतून मिळालेले चॅलेंज परतवून लावणार?

दरम्यान, ज्या आमदार, खासदारांसह इतरांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला, त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. पण, ज्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, त्याचा फटका त्यांना आगामी निवडणुकीत बसू शकतो, असा अंदाज आहे. दरम्यान, जरांगेंची दुसरी मुदत संपल्यानंतर जर तयारी दाखविलेल्या लोकप्रतिनिधींनी राजीनामा दिला, तरच त्यांना तो खरंच द्यायचा होता, असे सिद्ध होईल. नाही तर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मारलेल्या डोळ्यानंतर जशी चर्चा झाली, तशीच ती पुन्हा त्यावरही रंगेल.

पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार (अजित पवार गट) अण्णा बनसोडे, मावळचे शिवसेना (शिंदे गट) खासदार श्रीरंग बारणे यांनी राजीनाम्याची तयारी दाखवली. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी जरांगेंनी उपोषण स्थगित केल्याने त्यांच्यावर ती वेळच आली नाही. त्याचवेळी भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे, चिंचवडच्या अश्विनी जगताप, विधान परिषद सदस्य उमा खापरे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला, पण राजीनाम्याची तयारी दाखवली नव्हती.

Anna Bansode-Srirang Barne
Sangola Gram Panchyat Election : प्रचार करताना हृदयविकाराच्या धक्क्याने ग्रामपंचायत उमेदवाराचा मृत्यू; निवडणूक स्थगित

आमदार लांडगेंनी मात्र मराठा मोर्चाच्या साखळी उपोषणाला पिंपरीत भेट देऊन पाठिंबा जाहीर केला होता. मावळचे आमदार सुनील शेळकेंनी आपले दौरे, कार्यक्रम मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रद्द केले होते. आता ते पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

Anna Bansode-Srirang Barne
CJI Dhananjay Chandrachud News : कसं वाढणार न्यायालयात महिला आणि मागासांचे प्रतिनिधित्व? सरन्यायाधीश म्हणतात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com