मॅट्रीमोनी साइटवरील ओळख महागात, अडीचशे तरुणींची कोट्यवधींची फसवणूक व लैंगिक शोषण

तरुणींची आर्थिक आणि लैंगिक फसवणूक करणाऱ्या दोन ठकसेनांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Pimpri Police) बेंगलोर येथून पकडून आणले.
IPS Krishnaprakash
IPS Krishnaprakash Sarkarnama

पिंपरी : सायबर गुन्ह्यांत (Cyber Crime) सध्या प्रचंड वाढ झाली आहे. त्यातही मॅट्रीमोनियल साइटवरून विवाहेच्छूक तरुणींची फसवणूक होण्याचे प्रमाण त्यात जास्त आहे. अशाच जीवनसाथी या मॅट्रीमोनिय़ल साइटवरून (Jeevansathi Matrimony Site) आपला बनावट प्रोफाईल पाठवून पिंपरी चिंचवडसह, पुणे, बेंगलोर, दिल्ली येथील अडीचशेपेक्षा जास्त तरुणींची आर्थिक आणि लैंगिक फसवणूक करणाऱ्या दोन ठकसेनांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (वाकड पोलिस ठाणे) (Pimpri Police) बेंगलोर येथून पकडून आणले. त्यांच्याकडून दोन आलिशान मोटारी, रोकड, आय़फोनसह अनेक मोबाईल, लॅपटॉप असा पाऊण कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. केंद्र सरकारमध्ये वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगत त्यांनी हा गंडा घातला आहे. यातील अनेक तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांनी त्यांचे लैंगिक शोषणही केले आहे.

IPS Krishnaprakash
आर्यन खानला जामीन मिळवून देणारे रोहतगीही राणेंच्या प्रकरणात ठरले अपयशी

केंद्र सरकारमध्ये वरिष्ठ अधिकारी असल्याचा बनावट प्रोफाईल या दोघांनी तयार करून तो जीवनसाथी या मॅट्रीमोनियल साइटवर टाकला होता. त्यासाठी त्यांनी तयार केलेली बनावट ओळखपत्रे, आधारकार्ड, पॅनकार्ड पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केली आहेत. निशांत रमेशचंद्र नंदवाना (वय ३३) ऊर्फ अधितांश अग्निहोत्री ऊर्फ अभय कश्यप आणि विशाल हर्षद शर्मा ऊर्फ अश्विन शुक्ला ऊर्फ अथर्वन तिवारी (वय ३३, दोघेही सध्या रा.बाणेर, मूळचे राज्यस्थान) अशी य़ांची नावे आहेत. त्यांना २८ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यांच्याविरुद्ध फसवणुक आणि बलात्काराचा गुन्हा वाकड पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. बेंगलोर, दिल्ली, पुणे येथेही असे गुन्हे वाकड पोलिसांनी या ठकसेनांना पकडल्यानंतर आता दाखल होत आहेत. प्राथमिक चौकशीत त्यांनी पुण्यातील ९१, बेंगलोरमधील १४२, तर गुरगाव, दिल्ली येथील २२ तरुणींची दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समजले आहे. बळी पडलेल्या तरुणींचा व फसवणुकीच्या रकमेचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी वाकड पोलिसांच्या या कामगिरीची पत्रकारपरिषद घेऊन माहिती दिली. तसेच, ती केलेल्या पथकाला पन्नास हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला.

IPS Krishnaprakash
त्या नेत्याने आपल्या एकुलत्या एक मरणासन्न मुलाचे ऑक्सिजन काढून घेतले

आय़टीयन्स मोठ्या संख्येने राहत असलेल्या वाकड या पिंपरी-चिंचवड शहराच्या आलिशान भागातील दोन तरुणीही या भामट्यांच्या शिकार झाल्या आहेत. त्यांनी कृ्ष्णप्रकाश यांची भेट घेऊन आपबिती कथन केली. त्यातील एका आरोपीने आपण केंद्र सरकारच्या सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटमध्ये चीफ प्रोजेक्ट मॅनेजर असल्याचा बनावट प्रोफाईल तयार करून तो मॅट्रीमोनियल वेबसाईटवर अपलोड केला होता. त्याला वाकडमधील एका तरुणीने प्रतिसाद दिला. त्यावर त्याने तिला एका आलिशान मोटारीतून फिरायला नेले. ओळख वाढवली. नंतर एका प्रकल्पासाठी साठ लाख रुपयांची मागणी केली. त्यातील तीन लाख घेऊन तो पसार झाला. तर, दुसऱ्या घटनेत वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतीलच दुसऱ्या तरुणीला दुसऱ्या आरोपीने आपण केंद्राच्या कृषी खात्यात डेप्यूटी डायरेक्टर असल्याचे सांगितले. तिला कंपास या महागड्या जीपमधून फिरायला नेले व जीपमध्येच तिला शारीरिक सबंध ठेवण्यास भाग पाडले. नंतर तिच्याकडून व्यवसायासाठी पाच लाख रुपये घेऊन तो फरार झाला होता.

IPS Krishnaprakash
पद्मभूषण जाहीर होऊनही 'मायक्रोसॉफ्ट'च्या सत्या नाडेलांचं मौन!

या दोन्ही घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्तांनी तातडीने वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांना तपासाचा आदेश दिला. त्यांनी आपले पीआय (गुन्हे) संतोष पाटील, गुन्हे अन्वेषण पथकाचे एपीआय अभिजीत जाधव, संतोष पाटील व पथकाला कामाला लावले. त्यांनी आरोपींच्या मोबाईलवरून त्यांचे लोकेशन शोधले. ते बेंगलोरमध्ये होते. वाकड पोलिसांचे पथक तडक तिकडे गेले. त्यांनी तेथे एका आलिशान वस्तीत दुसऱ्याच नावाने राहत असलेल्या या दोघा भामट्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलिस उपायु्क्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत दिसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास झाला. या ठकसेनांना बळी पडलेल्या तरुणींनी संपर्क साधण्याचे आवाहन कृष्णप्रकाश आणि वाकड पोलिसांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com