Maval Assembly : 'मावळ पॅटर्न' भारी ठरणार की दादांचा शिलेदार पुन्हा बाजी मारणार? 'एक्झिट पोल' चा अंदाज काय सांगतो?

Sunil Shelke Vs Bapusaheb Bhegade News : मावळ मतदारसंघात 3 लाख 86 हजार 162 मतदार आहेत. त्यापैकी दोन लाख 80 हजार 319 म्हणजेच 72.59 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला आहे.
Sunil Shelke Vs Bapusaheb Bhegade .jpg
Sunil Shelke Vs Bapusaheb Bhegade .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : मावळ विधानसभा मतदारसंघाच्या निकालावर सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. एकीकडे महायुतीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) निवडणूक रिंगणात आहेत. तर दुसरीकडे महायुतीच्या नाराजांनी आणि महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार बापू भेगडे मैदान गाजवण्यासाठी तयार आहेत. बहुतांश राजकीय पक्षांनी अपक्ष बापू भेगडे यांना पाठिंबा दिल्याने सध्या मतदारसंघांमध्ये मावळ पॅटर्नची चर्चा आहे.

मावळ मतदारसंघात 3 लाख 86 हजार 162 मतदार आहेत. त्यांपैकी दोन लाख 80 हजार 319 म्हणजेच 72.59 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला आहे. गेल्या निवडणुकीमध्ये मावळ विधानसभा मतदारसंघातून 71. 16% मतदान झाले होते. यंदा मतदानाचा टक्का वाढला असून तब्बल 32358 आधीचे मतदान झाले आहे. यामुळे वाढीव मतदान कोणाच्या पथ्यावर पडणारा याकडे सर्वांचेच लक्ष लागला आहे.

अपक्ष आणि महायुतीचे उमेदवार हे दाेन्ही तळेगाव दाभाडे या भागातील रहिवासी आहेत. यंदाच्या प्रचारात स्थलांतरित होत असलेले उद्योग, वाढत चाललेली गुन्हेगारी हे मुद्दे प्रमुख राहिले. त्यामुळे लाेणावळा, वडगाव, देहूराेड आणि देहूगाव या शहरी भागात आणि पवन, आंदर, नाणे मावळ या ग्रामीण भागाने कोणाला झुकते माप दिले यावर मावळचा पुढचा आमदार ठरणार आहे.

Sunil Shelke Vs Bapusaheb Bhegade .jpg
Delhi Assembly Election : महायुतीने सेट केलेला नॅरेटिव्ह दिल्लीत भाजपवर उलटणार? केजरीवालांचा ‘प्लॅन’ तयार

'साम टीव्ही'चा एक्झिट पोल पाहिला तर विद्यमान आमदार असलेले सुनील शेळके हे पुन्हा एकदा बाजी अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे कुठेतरी मावळ पॅटर्न मागे पडतो का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

मावळ (Maval) मतदारसंघावर पूर्वी काँग्रेसचं वर्चस्व होतं. 1995 ते 2019 अशी सलग 24 वर्षे या मतदार संघावर भाजपचा वर्चस्व राहिलं. या कालावधीत भाजपचे तीन उमेदवार आमदार म्हणून निवडून आले. 2019 मध्ये मात्र इथे राष्ट्रवादीला यश मिळालं. भाजपमधून ऐन निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत सुनील शेळके यांनी या ठिकाणी विजय मिळवला. मागील वेळी तब्बल 94 हजारेंनी हा विजय सुनील शेळके यांनी साकार केला होता.

Sunil Shelke Vs Bapusaheb Bhegade .jpg
Satta Bazar Predictions : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? सट्टा बाजारात एकाच नावाचा डंका...

सलग दोनवेळेचे आमदार असलेले भाजपचे बाळा भेगडे यांचा त्यांनी पराभव केला होता. यंदाचा चित्र मात्र थोडा वेगळा आहे. बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरलेले बापू भेगडे यांना सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सध्या सुनील शेळके यांचं पारडं जरी जड वाटत असलं तरी मतमोजणी वेळी काहीतरी वेगळं चित्र दिसेल, असा विश्वास येथील स्थानिक नेत्यांना असल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com