Ruplekha Dhore Death: मावळच्या पहिल्या महिला आमदार रूपलेखा ढोरे यांचे निधन

Maval first woman MLA: प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसापासून त्या राजकीय जीवनात फारशा सक्रिय नव्हत्या. पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना मात्र त्या उपस्थित राहात असत. पवनानगर येथे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नुकत्याच झालेल्या प्रचारसभेला त्या उपस्थित होत्या.
Maval first woman MLA
Maval first woman MLASarkarnama
Published on
Updated on

Pune News: मावळच्या माजी आमदार रुपलेखा खंडेराव ढोरे (वय 76) यांचे आज निधन झाले. त्या मावळ तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार होत्या. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

मावळ पंचायत समितीचे दिवंगत माजी सभापती दादासाहेब ढोरे यांच्या त्या पत्नी, भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष मनोज तथा भाऊसाहेब ढोरे व उद्योजक सचिन ढोरे यांच्या मातुःश्री होत. त्यांच्या निधनाने मावळ तालुक्यात शोककळा पसरली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ह्दयविकासाचा त्रास होत असल्याने त्यांना काल मंगळवारी सोमटणे येथील खासगी रुग्णालयात करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसापासून त्या राजकीय जीवनात फारशा सक्रिय नव्हत्या. पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना मात्र त्या उपस्थित राहात असत. पवनानगर येथे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नुकत्याच झालेल्या प्रचारसभेला त्या उपस्थित होत्या.

Maval first woman MLA
Ajit Pawar Plane Carsh: 45 सेकंदांमध्ये काय झाले! अजितदादांच्या विमान अपघाताचा CCTV फुटेज समोर

१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी दिली. त्यांनी माजी राज्यमंत्री मदन बाफना यांचा पराभव केला होता. मावळच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. त्यावेळी राज्यात भाजप-शिवसेना युती सत्तेत आली.

Maval first woman MLA
Ajit Pawar Death: बारामती पोरकी झाली! अनेक जण धाय मोकलून रडत होते...दादा आपल्यात नाहीत ही भावनाच अस्वस्थ करणारी...

राजकीय प्रवास

  • रूपलेखा ढोरे यांनी १९९२ मध्ये तत्कालीन वडगाव-इंदोरी जिल्हा परिषद मतदारसंघातून विजय मिळविला.

  • त्याच वेळी पंचायत समितीमध्ये काँग्रेस व भाजपचे समसमान बलाबल झाल्याने चिठ्ठ्या टाकून उपसभापतिपदाची निवडणूक झाली होती.

  • यात त्या विजयी झाल्या होत्या. त्यांनी उपसभापतिपद तीन वर्षे भूषविले होते.

  • भाजपने १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी दिली. त्यात त्या विजयी झाल्या होत्या.

  • महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून तालुक्यात ५५ नळ पाणी पुरवठा योजनांची कामे केली होती.

  • मावळ तालुका टँकरमुक्त केला. मंगरूळ येथील आंद्रा धरणाच्या कामही त्यांच्या कार्यकाळात सुरू झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com