Maval Politics: मावळातील कट्टर विरोधक शेळके-भेगडे यांच्यात मनोमिलन: राजकीय समीकरणे बदलणार

NCP MLA Sunil Shelke and former BJP minister Bala Bhegade Together: आगामी नगरपरिषद निवडणुकीत महायुतीतर्फे भाजपचे नगराध्यक्ष पदासाठी संतोष दाभाडे आणि राष्ट्रवादीचे गणेश काकडे यांना समान संधी देण्याचा निर्णय या वेळी जाहीर करण्यात आला.


NCP MLA Sunil Shelke and former BJP minister Bala Bhegade Together
NCP MLA Sunil Shelke and former BJP minister Bala Bhegade TogetherSarkarnama
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके आणि भाजपचे नेते, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात हे दोघेही एकत्र आले आहे. त्यामुळे तळेगावच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तळेगाव शहराच्या विकासाला गती मिळावी यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून ही युती केल्याचे आमदार सुनील शेळके आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांनी स्पष्ट केले.

आज मुंबईत निर्णायक बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबईत बैठक होणार आहे. आगामी काही दिवसांत तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे, असे या दोन्ही नेत्यांनी सांगितले.

तळेगाव दाभाडे येथे पत्रकार परिषदेत या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. आगामी नगरपरिषद निवडणुकीत महायुतीतर्फे भाजपचे नगराध्यक्ष पदासाठी संतोष दाभाडे आणि राष्ट्रवादीचे गणेश काकडे यांना समान संधी देण्याचा निर्णय या वेळी जाहीर करण्यात आला. या घोषणेमुळे तळेगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

दीर्घकाळ एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे भाजप नेते बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके अखेर एका मंचावर आले आहेत. दोघांनी एकमेकांना टाळी देत महायुतीवर अधिकृत शिक्कामोर्तब केल्याने स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे. तळेगावच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडला आहे. या राजकीय घडामोडीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (उदा. तळेगाव, लोणावळा नगरपरिषद) मावळमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घोषणेनंतर तालुक्यात चर्चेला उधाण

तळेगावात युतीची घोषणा होताच तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने लोणावळा नगरपरिषदेसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. वडगाव नगरपंचायतीसह जिल्हापरिषद व पंचायत समितीत सर्व उमेदवार घड्याळ चिन्हावर लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

तळेगावात मात्र महायुती जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस मधील इच्छुक उमेदवार चलबिचल झाले आहेत. राष्ट्रवादीतील अनेक इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली असून, त्यामुळे उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या तारखेपर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडू शकतात, अशी चर्चा रंगली आहे.

या पत्रकार परिषदेला माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार सुनील शेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, गणेश काकडे, संतोष दाभाडे, विठ्ठल शिंदे, सुरेश चौधरी, सुरेश धोत्रे, कृष्णा कारके, सत्यशीलराजे दाभाडे, शैलजा काळोखे, सुहास गरुड, आणि इंदरमल ओसवाल आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com