Maval Loksabha Election 2024 Result: मावळात दोन्ही शिवसेनेत काट्याची टक्कर, शिंदे गट पडतोय ठाकरेंवर भारी

Lok Sabha Election Results Live Updates 2024: मावळमध्ये अडीच लाख मतांनी निवडून येऊ असा दावा बारणेंनी मतदानानंतर केला होता. मात्र,काट्याची सुरु असलेली टक्कर पाहता त्यांना वा विजयी होणाऱ्या उमेदवाराला तेवढे लीड मिळेल,असे दिसत नाही.
Maval Loksabha Election 2024 Result
Maval Loksabha Election 2024 Result

Pimpri: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीस आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली.या निकालाचे अंदाज १ जून रोजी एक्झिट पोलने वर्तवले होते. मावळसह राज्यभरात ते खरे ठरू पाहत आहे.मावळमध्ये महायुतीचे श्रीरंग बारणे हे विजयी होतील,असा अंदाज एक्झिट पोलने दिलेला आहे.

मावळमध्ये शिंदे शिवसेनेचे बारणे हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. त्यांनी लाखभर मते आता घेतली आहेत.चौथ्या फेरीअखेर त्यांनी १६ हजारांचे लीड घेतले आहे. एकूणच त्यांची वाटचाल खासदारकीच्या हॅटट्रिकच्या दिशेने सुरु झाली आहे. तसं झालं,तर मावळमध्ये प्रथमच लोकसभेला हॅटट्रिक होणार आहे.

काही एक्झिट पोलचे अंदाज, मात्र पूर्णपणे महाराष्ट्राच्या बाबतीत चूकीचे शाबीत होत आहेत. त्यांनी महायुतीला ३३ ते ३५ जागा मिळतील,असे सांगितले होते. प्रत्यक्षात सकाळी ११ वाजेपर्यंत महायुती फक्त वीस जागांवर आघाडीवर होती.

मावळमध्ये अडीच लाख मतांनी निवडून येऊ असा दावा बारणेंनी मतदानानंतर केला होता. मात्र,काट्याची सुरु असलेली टक्कर पाहता त्यांना वा विजयी होणाऱ्या उमेदवाराला तेवढे लीड मिळेल,असे दिसत नाही.

लाखाच्या आतच मताधिक्याने मावळात विजय होणार असल्याचा सरकारनामाने वर्तवलेला अंदाज खरा ठरण्याची शक्यता आहे. मावळमधील आघाडीचे (ठाकरे शिवसेना) संजोग वाघेरे-पाटील यांनीही आपण पावणेदोन लाखाच्या लीडने निवडून येऊ, असा दावा केला होता. पण,तूर्त तो खरा होताना दिसत नाही.

२०१४ ची मोदी लाट दहा वर्षानंतरही देशात थोड्या होईना का प्रमाणात असल्याचे दिसून आले होते.त्यातूनच मावळात बारणे हे आघाडीवर आहेत. त्यांना विद्यमान खासदार असल्याचा फायदा झाला आहे.तर वाघेरे हे काहीसे कमकुमत उमेदवार असल्याचा त्यांना तोटा झाला आहे.

मावळमध्ये मोठी ताकद असलेल्या भाजपने मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी बाऱणेंच्या मागे मोठी ताकद उभी केल्याचे निकालातून दिसत आहे.त्याचवेळी वाघेरेंना आतापर्यंत मिळालेली लक्षणीय मते पाहता कोरी पाटी असूनही त्यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना मिळत असलेल्या सहानुभूतीचा फायदा झाल्याचे आढळले आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com