Pimpri News: राज्यातील भाजप-शिंदे शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सामील झाल्यानंतर प्रथमच तळेगाव दाभाडे (ता.मावळ,जि.पुणे) येथे पहिल्या टप्प्यातील 13 कोटी रुपयांच्या 13 विविध विकासकामांचे भूमिपूजन गुरुवारी (दि.18) झाले. त्यासाठी स्थानिक आमदार मावळचे राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांनी महायुतीचा धर्म पाळत भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या सर्व स्थानिक नेत्यांची नावे निमंत्रणपत्रिकेत टाकून त्यांना आमंत्रित केले. पण, त्यांनी त्याकडे पाठ फिरवल्याने त्याची मोठी चर्चा झाली.
दरम्यान, शेळकेंच्या मागणीवरून तळेगावहून बदली झालेले आणि पुन्हा तेथेचे आलेले नगपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के.पाटील यांनीही 13 पैकी एकाही भूमिपूजनाला हजेरी न लावल्याने त्यांच्यातील आणि आमदार शेळकेंतील वादाची पुन्हा चर्चा रंगली. भाजपचे स्थानिक माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे निमंत्रणपत्रिकेत नाव असूनही त्यांची गैरहजेरी खटकली. आपण काल पुण्यात होतो, असा दावा पाटील यांनी 'सरकारनामा'शी बोलताना केला. तर, भेगडेंचा संपर्क झाला नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नवा रस्ता तयार करणे, रस्त्याचे डांबरीकरण, कॉंक्रीटीकरण, उद्यान विकसित करणे, गटार बांधणे अशा 13 कोटी 31 लाख रुपयांच्या 13 विविध विकासकामांची भूमिपूजने काल दिवसभर तळेगावात सुरु होती. त्याला बहूतांश राष्ट्रवादीचीच (अजित पवार गट) मंडळी हजर होती. बाळा भेगडेंसह भाजप व शिंदे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी, मात्र त्यापासून चार हात दूर राहणे पसंत केले.
पुणे जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष आणि किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, माजी नगरराध्यक्षा चित्रा जगनाडे, मीरा फल्ले, अॅड. रंजना भोसले, बाळासाहेब जांभूळकर, उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे, अनंत भोपळे, माजी नगरसेवक संदीप शेळके, चंद्रकांत शेटे आदी गैरहजर होते. तर, राष्ट्रवादीचे मावळचे अध्यक्ष गणेश खांडगे, माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष राष्ट्रवादीचेच बापूसाहेब भेगडे, माजी नगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी, माजी उपनराध्यक्षा वैशाली दाभाडे आदींनी हजेरी लावली.
(Edited by : Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.