महापौरांचा रक्तदानाचा संकल्प पुणेकरांकडून सिद्धीस; तीन हजार ८६० जणांनी केले रक्तदान

सेवा उपक्रम करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर असतो. त्यास अनुसरून हा उपक्रम घेण्यात आला.
महापौर मुरलीधर मोहोळ वाढदिवस
महापौर मुरलीधर मोहोळ वाढदिवस सरकारनामा
Published on
Updated on

पुणे : शहरातील रक्त पिशव्यांचा तुटवडा लक्षात घेता महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ९ नोव्हेंबर या वाढदिवशी रक्तदान महासंकल्प दिवस आयोजित करत पुणेकरांना रक्तदान करुन शुभेच्छा देण्याचे आवाहन केले होते. महापौरांच्या आवाहनावर रक्तदानासाठी पुणेकर एकवटल्याचे चित्र दिसले. एका दिवसात तब्बल तीन हजार ८६० रक्तदात्यांनी महापौरांना रक्तदानरुपी शुभेच्छा दिल्या.

महापौर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त ‘संस्कृती प्रतिष्ठान’च्या वतीने म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पुणेकरांना उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या शिबिरात विविध १९ रक्तपेढ्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी या शिबिराला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, आमदार भीमराव तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे,आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह नगरसेवक, भाजपा पक्षपदाधिकारी, कलाकार, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.

महापौर मुरलीधर मोहोळ वाढदिवस
मलिकांचे आरोप म्हणजे; बिरबलाच्या कथेतील न शिजलेली ‘बिर्याणी’

रक्तदानाच्या आवाहनाला पुणेकरांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ म्हणाले, ‘‘पुणेकर एकत्र आले तर काय करु शकतात? हे कोरोना संकटाचा सामना करताना दिसून आले होते. सद्यस्थितीत शहरात रक्ताचा तुटवडा असताना पुणेकरांनी रक्तदानासाठी दाखवलेली एकजूट समाधान देणारी होती. तीन हजार ८०० पेक्षा जास्त नागरिकांनी रक्तदानरुपी दिलेल्या शुभेच्छा गरजूंना जीवनदान देणाऱ्या ठरणाऱ्या आहेत. रक्तदान करणाऱ्या सर्व पुणेकरांचा मी ऋणी आहे. अनेकांना इच्छा असूनही वैद्यकीय कारणांनी रक्तदान करता आले नाही. त्यांनी प्रत्यक्ष उपक्रमाला भेट देऊन दिलेल्या शुभेच्छाही महत्त्वाच्या होत्या.

महापौर मुरलीधर मोहोळ वाढदिवस
आनंदाची बातमी : ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत एका वर्षाची सवलत

शिबिराच्या आयोजनाबद्दल माहिती देताना ‘संस्कृती प्रतिष्ठान’चे सचिव निलेश कोंढाळकर म्हणाले, ‘‘रक्तदानाच्या आवाहनानंतर रक्तदात्यांचा प्रतिसाद लक्षात घेता रक्तपेढ्यांची संख्या १९ पर्यंत वाढवण्यात आली. रक्तदान प्रक्रियेत सुलभता ठेऊन कमी वेळात जास्तीत जास्त दात्यांना सहभागी होता येईल, अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले. त्यामुळेच दात्यांची संख्या ३ हजार ८०० पेक्षा जास्त झाली’’

रक्तदानाचा उपक्रम लोकोपयोगी : चंद्रकांत पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व कार्यकर्त्यांना नेहमीच सेवा उपक्रमावर भर देण्याचा आग्रह धरतात. त्यालाच अनुसरून महापौर माहोळ यांनी वाढदिवसाला पुष्पगुच्छ नको रक्तदान करा, असे आवाहन केले. त्या आवाहनाला पुणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महापौरांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल, त्यांचे भाजपा परिवाराच्या वतीने मन:पूर्वक अभिनंदन.‌ भविष्यातदेखील त्यांनी असेच लोकोपयोगी उपक्रम राबवावेत, यासाठी शुभेच्छा, अशी भावना यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केली.

लेकीसह महापौरांकडून रक्तदान !

रक्तदान शिबिराची सुरुवात महापौर मुरलीधर मोहोळ यांची कन्या सिद्धी हिच्या आणि स्वतः महापौरांच्या रक्तदानाने करण्यात आली. त्यानंतर दिवसभर रक्तदात्यांनी रक्तदान करत महापौरांना शुभेच्छा दिल्या. सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या रक्तदानाची सांगता रात्री साडेदहा वाजता करण्यात आली.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com