रांगोळी, तोरणे सर्वच व्यर्थ...तयारी वाया गेली! मेधा कुलकर्णी नाराज

कुलकर्णी यांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Medha kulkarni
Medha kulkarniSarkarnama

पुणे : कोरोना (Corona) रुग्णांची संख्या आटोक्यात असल्याने राज्य सरकारने इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा (Schools) एक डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या विषाणुचे कारण देत पुण्यासह मुंबई नाशिक आदी महापालिकांनी शाळा सुरू करण्यास नकार दिला आहे. पुण्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय अनिश्चित आहे. पण भाजपची (BJP) सत्ता असलेल्या पुणे महापालिकेने (PMC) आयत्यावेळी घेतलेल्या या निर्णयावर पक्षाच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) नाराज झाल्या आहेत.

राज्यभरात एक डिसेंबरपासून शाळा सुरू होणारच, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी ठामपणे सांगितले होते. त्यानुसार अऩेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. शाळांची स्वच्छता, फुले, रांगोळीने शाळा सजवल्या होत्या. पण पुण्यासह अनेक महापालिकांनी त्यांच्या पातळीवर वेगळा निर्णय घेत राज्य सरकारला तोंडावर पाडले आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी मंगळवारी (ता. 30) शाळा सुरू केल्या जाणार नाहीत, हे जाहीर केले.

Medha kulkarni
झांबियातून पुण्यात आलेला एक रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह;..पण भीतीचे कारण नाही

यावरून मेधा कुलकर्णी यांनी उघडपणे नाराज व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करून महापालिका व महापौरांच्या निर्णयावर टीका केली आहे. '1 डिसेंबरचा निर्णय अगदी आयत्या वेळी बदलला. पालक, विद्यार्थी, रिक्षावालेकाका, शिक्षक सर्वांचीच तयारी वाया गेली. सॅनिटायझेशन, रांगोळी, तोरणे, वर्गशिक्षकांनी पालकांना केलेले अगणित फोन सर्वच व्यर्थ गेले. 15 डिसेंबर चा निर्णय थोडा वेळेत सांगायला हवा होता, असं कुलकर्णी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, मंगळवारी महापालिकेकडून शाळा सुरू केल्या जाणार नसल्याचे आदेश काढण्यात आले आहेत. तसेच महापौरांनीही याबाबत घोषणा केली. पुणे मनपा हद्दीतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय आपण घेतला असून १५ डिसेंबरला एकूणच आढावा घेऊन पुढील निर्णय जाहीर केला जाईल, असं महापौरांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरीयंट च्या पार्श्वभुमीवर मुंबई महापालिका आणि पुणे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. मुरलीधर मोहोळ आणि महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्यातील बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे. महापालिकेकडून ओमिक्रॉन या नव्या विषाणूचे कारण देण्यात आले आहे. त्यामुळे येत्या 15 तारखेनंतर तरी इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू होणार का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही शाळा सुरु करण्यासंदर्भात महत्वाची माहिती दिली होती. देशात सध्या ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही आणि हा व्हेरीयंट अतिशय धोकादायक असल्याचं कुठेही सिद्ध झालेलं नाही, पण, दक्षिण आफ्रिकेत व्हेरीयंटचा प्रभाव पाहता काळजी घ्यायला हवी, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य विभाग आणि टास्क फोर्सची बैठक झाली. त्यानंतर, 1 डिसेंबरला ठरल्याप्रमाणे शाळा सुरू होणार असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्टपणे सांगितले होते.

तर राज्यातील शाळा सुरु करताना जिल्हा प्रशासनालाही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या यात दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फूटाचे अंतर, शाळेत मास्क घालणे बंधनकारक, बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करू नये, शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम, खेळ किंवा सामूहिक प्रार्थना घेऊ नयेत, वैयक्तिक आणि शाळेत स्वच्छता, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे, ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या किंवा वर्गात येण्यास परवानगी द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com