Pune News : भाजपसाठी नेहमीच बालेकिल्ला राहिलेला पुणे कोथरुड विधानसभा मतदारसंघात कोल्हापूरचे दादा म्हणजेच राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांची 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी जाहीर झाली. यामुळे कोथरुडमधून आमदार असलेल्या मेधा कुलकर्णी यांना आपल्या हक्काचे मतदारसंघ सोडावे लागले होते. तेव्हापासूनच कुलकर्णी यांच्यावर पक्षाकडून अन्याय झाल्याची भावना मतदारसंघातून व्यक्त होत होती. याबाबत अनेकदा प्रत्यक्ष-प्रत्यक्षपणे स्वत: कुलकर्णी यांच्याकडून अस्वस्थता व्यक्त केली गेली. अखेर आज कुलकर्णी यांना थेट राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांचा राजकीय वनवास संपल्याचे दिसून येत आहे. अखेर मेधाताईंनी करुन दाखवलंच, अशी भावना राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)
राज्यसभेच्या जागांसाठी येत्या महिना अखेर निवडणूक होणार आहे. यामध्ये राज्यातील सहा जागांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या वाट्याला पाच जागा येणार आहेत. यासाठी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या नावाची वर्णी अखेर लागली आहे. तर नुकतेच भाजपवासी झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि वैद्यकीय क्षेत्रात असलेले अजित गोपछडे यांनाही भाजपने उमेदवारी दिली आहे. (Medha Kulkarni News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मेधा कुलकर्णी या कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या माजी आमदार आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्या कोथरूड मतदार संघातून विजयी झाल्या होत्या. मात्र 2019 च्या निवडणुकीत पक्षाने त्यांचे तिकीट कापून तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यामुळे कुलकर्णी काही प्रमाणात नाराज असल्याची चर्चा सुरुवातीच्या काळात सुरू झाली होती.
कोथरुडच्या विद्यमान आमदार असतानाही, तसेच आमदार म्हणून देखील कुलकर्णी यांनी आपली भूमिका अधिक चांगल्या प्रकारे पार पाडली होती. अशी सकारात्मक बाब असतानाही पक्षाने त्यावेळी अचानक त्यांना उमेदवारी नाकारल्याने या भागातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी सहानुभूती निर्माण झाली होती. उमेदवारी नाकारल्यानंतरही त्यांनी जाहीरपणे कधीही त्यांनी आपली नाराजी बोलून दाखविली नाही. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांची नियुक्ती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केंद्राच्या समितीवर केली होती. पक्षनिष्ठेचे फळ अखेर त्यांनी मिळाले असून, त्या आता संसद सदस्य म्हणून देशाच्या सर्वोच्च सभागृहात प्रवेश करण्यास सज्ज झाले आहेत.
पक्षाने दिलेली ही जबाबदारी पार पाडताना मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी अनेक कार्यक्रम घेत पक्षाचा नावलौकिक वाढवला आहे. त्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना राज्यसभेसाठी संधी दिली गेली. राज्यसभेसाठी भाजपने(BJP) कुलकर्णी यांच्या नावाची वर्णी लावल्याने आता आगामी लोकसभेच्या भाजपच्या उमेदवारीमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
पक्षाने दिलेली ही जबाबदारी पार पाडताना कुलकर्णी यांनी अनेक कार्यक्रम घेत पक्षाचा नावलौकिक वाढवला आहे. त्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना राज्यसभेसाठी संधी दिली गेली. राज्यसभेसाठी भाजपने (BJP) कुलकर्णी यांच्या नावाची वर्णी लावल्याने आता आगामी लोकसभेच्या भाजपच्या उमेदवारीमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पुण्यात भाजपने यापूर्वी कसबा विधानसभेसाठी मुक्ता टिळक यांना तर मागील लोकसभेला गिरीश बापट यांना उमेदवारी दिली होती.
काही दिवसांपूर्वीच टिळक आणि बापट या दोन्ही लोकप्रतिनिधींचे निधन झाल्याने सध्या भाजपकडे 'ब्राह्मण' समाजाचे प्रतिनिधीत्व नाही. या पार्श्वभूमीवर राज्यसभेसाठी प्राध्यापक मेधा कुलकर्णी यांच्या नावाचा विचार केला गेला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.