मंत्री भेगडे व आमदार पाचर्णे जेंव्हा फुगडी खेळतात !

रांजणगाव गणपती येथील माजी आमदार स्वर्गीय बाबूराव दौंडकर यांच्या स्मारकासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून विठ्ठलवाडीतील वनविभागाच्या जमिनीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी 10 कोटींचा निधी देणार आहे.-राज्यमंत्री बाळा भेगडे
Fugadi.
Fugadi.
Published on
Updated on

तळेगाव ढमढेरे : प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र विठ्ठलवाडी  येथे आषाढी एकादशीनिमित्त  पर्यावरण व पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे महापूजेसाठी आले होते . तेथे आमदार बाबूराव पाचर्णे आणि अन्य मान्यवरही हजर होते . 

पांडुरंग विद्या मंदिरच्या विद्यार्थी - विद्यार्थिनींची दिंडी काढण्यात आली होती. ग्यानबा - तुकारामच्या गजरात दिंडीत ग्रामस्थ देखील सहभागी झाले . त्यावेळी काही ग्रामस्थांनी दिंडीसमोर फुगडीचा फेर धरला . ग्रामस्थांनी आग्रह केल्यानंतर मंत्री बाळा भेगडे आणि आमदार बाबूराव पाचर्णे या आनंदात सहभागी झाले आणि दोघांनी फुगडीचा फेर धरला . ग्रामस्थांनी यावेळी टाळ्यांचा कडकडाट  केला . त्यांनतर सर्व अमान्यवराशी मंत्री महोदयांना सुवासिनींनी ओवाळले . मग विठ्ठल मंदिरात सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत  एकादशीनिमित्त भेगडे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.

त्यांनतर झालेल्या कार्यक्रमात बोलताना बाळा भेंडे म्हणाले," शिरूर तालुक्‍यात अनेक वर्षे प्रलंबित असलेला पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार आहे. तळेगाव ढमढेरे व इतर गावातील शेतकऱ्यांच्या सातबारावर पुनर्वसनाचे शेरे असल्याने खातेफोड करता येत नाही. अनेक वर्षांचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधितांची येत्या सोमवारी पुण्यात बैठक होणार आहे. या बैठकीत पुनर्वसनाचे शेरे कमी करण्यासाठी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे." 

श्री.  भेगडे पुढे  म्हणाले, " शिरूर-हवेली तालुक्‍याला पूर्वीप्रमाणेच पाणी मिळणार आहे. कामगारांची नावनोंदणी ग्रामपंचायत पातळीवर ऑनलाइन चालू असून सर्व कामगारांनी या संधीचा फायदा करून घ्यावा. रांजणगाव गणपती येथील माजी आमदार स्वर्गीय बाबूराव दौंडकर यांच्या स्मारकासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून विठ्ठलवाडीतील वनविभागाच्या जमिनीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी 10 कोटींचा निधी देणार आहे.''

 या वेळी आमदार बाबूराव पाचर्णे, जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, जिल्हा बॅंकेचे संचालक निवृत्तिअण्णा गवारे, सामाजिक कार्यकर्ते संभाजीअप्पा गवारे यांची भाषणे झाली.

या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके, रोहिदास उंद्रे, विजय रणसिंग, विक्रम पाचुंदकर, उद्योजक राजेश लांडे, बाजार समितीचे संचालक राहुल गवारे, धर्मेंद्र खांडरे, श्रीकांत सातपुते, संदीप ढमढेरे, कैलास सोनवणे, दिलीप शेलार,

राजेंद्र शिंदे, हिरामण गवारे, बाबाजी गवारे, सोपान गवारे, सरपंच ललिता गाडे, उपसरपंच जयेश शिंदे, गटशिक्षणाधिकारी संदीप जठार, ग्रामसेवक दादाभाऊ नाथ, ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य,विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक उपसरपंच जयेश शिंदे यांनी केले. रघुनंदन गवारे व दिलीप गवारे यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com