दत्तात्रय भरणे निवडणुकीच्या मैदानात; हर्षवर्धन पाटील वाढवणार टेन्शन?

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे.
Harshvardhan Patil, Dattatray Bharne
Harshvardhan Patil, Dattatray BharneSarkarnama
Published on
Updated on

इंदापूर : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC Bank) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatrya Bharne) यांनी बुधवारी (ता. 1) ‘ ब ’ वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मागील 25 वर्षांपासून ते बँकेचे संचालक आहेत. बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने पून्हा एकदा बँकेवर जाण्याचा भरणे यांचा मार्ग सोपा असल्याचे मानले जात आहे. आता भरणे यांच्याविरोधात उमेदवार कोण असणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या 21 संचालक पदांसाठी ही निवडणूक होणार आहे. ता. 2 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार असून 29 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. ही बँक म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. राज्यमंत्री भरणे मागील 25 वर्षापासून संचालक असून त्यांनी अध्यक्षपदाची धुराही सांभाळली आहे. भरणे हे मागील अनेक वर्षापासून ‘ब ’ वर्गातून निवडणूक लढवत आहेत.

Harshvardhan Patil, Dattatray Bharne
सातशे शेतकऱ्यांच्या मृत्यूची नोंद नाही, मग लाखो कोरोना बळींचा आकडा कसा मिळवला?

भरणे यांनी बुधवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. अर्ज भरताना भरणे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, आमदार संजय जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, प्रवीण तुपे, जयदीप काळभोर, इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, नवनाथ रुपनवर, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

'ब' वर्गासाठी पणन व कृषी सहकारी संस्थाचे प्रतिनिधी मतदान करतात. जिल्हामध्ये सुमारे 90 मतदार आहेत. जिल्हा बँकेवर सतत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. तसेच जिल्ह्यातील बहुतेक पणन कृषी सहकारी संस्थांवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे. त्यामुळे भरणे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. पण सध्याची इंदापूर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) भाजपमध्ये गेले आहेत. तर विद्यमान संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनीही पाटलांना साथ दिली आहे.

त्यामुळे भरणे यांच्याविरोधात भाजपकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार की नाही, याबाबत उत्सुकता वाढली आहे. भरणे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवलेल्या पाटील यांना पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकारणाला वेगळं वळणं मिळालं आहे. आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भरणे आणि पाटील या दोघांमधील राजकारण रंगणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com