वालचंदनगर (जि. पुणे) : सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावच्या हद्दीतील वाघ वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने त्यावरून कशी ये-जा करावी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. राज्यमंत्री भरणे यांनी या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून न दिल्यास वाघ वस्तीवरील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (Minister of State for Construction Dattatreya Bharane's village road is bad condition)
राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या अंथुर्णे गावच्या हद्दीमध्ये वाघवस्ती आहे. या वस्तीकडे जाण्यासाठी जंक्शन-वालचंदनगर व अंथुर्णे- रत्नपुरी रस्त्याजवळून रस्ता आहे. हा रस्ता सुमारे १०० वर्षांपूर्वीचा जुना रस्ता आहे. पावसाळ्यामध्ये या दीड किमी अंतराच्या रस्त्याची दुरवस्था होते. येथून ये- जा करताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या वस्तीवरील नागरिक अनेक वर्षांपासून डांबरी रस्ता करण्याची मागणी करीत आहेत.
राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी सध्या कोट्यवधी रुपयांचा निधी आणला जात आहे. मात्र, वाघवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी निधीची तरतूद केली केली जात नसल्यामुळे वाघवस्तीवरील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. रस्त्याच्या कामासाठी निधीची तरतूद न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा वाघ वस्तीवरील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दशरथ वाघ यांच्यासह नागरिकांनी दिला आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सदस्या वैशाली प्रताप पाटील म्हणाल्या, ‘‘रस्त्याच्या खडीकरणाच्या कामासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. सुमारे २० लाख रुपयांच्या निधीची तरतूद लवकरच करण्यात येणार आहे.
निधी देण्यास टाळाटाळ : वाघ
राजकीय आकसापोटी या रस्त्याला निधी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. विद्यमान सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे स्वत:च्या गावातील विकासकामे करण्यामध्ये राजकारण व भेदभाव करत आहेत. रस्त्याचे व वाघ वस्तीवरील समाजमंदिराचे काम अपुरे आहे, असे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दशरथ वाघ यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.