Dattatray Bharane : मीही पवारांचा पठ्ठ्या....: दत्तात्रेय भरणेंनी हर्षवर्धन पाटलांना ललकारले

चौका-चौकात बोर्ड लावून विकास होत नसतो....
Dattatray Bharane-Harshvardhan Patil
Dattatray Bharane-Harshvardhan PatilSarkarnama
Published on
Updated on

इंदापूर (जि. पुणे) : विरोधकांना गप्पा मारू द्या, आपल्याला विकास कामे करायची आहेत. चौका-चौकात बोर्ड लावून विकास होत नसतो, लोकांचे प्रश्न सुटत नसतात, त्यासाठी काम करावे लागते. केंद्रात आणि राज्यात आपले सरकार नसले, तरी इंदापूर (Indapur) तालुक्याचा आमदार मीच आहे आणि मी पण पवारांचा पठ्ठ्या असल्याने निधी कसा आणायचा, हे मला कुणी सांगायची गरज नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांना लगावला. (MLA Dattatray Bharane criticizes former minister Harshvardhan Patil)

इंदापूर शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमात आमदार भरणे हे बोलत होते. त्यावेळी त्यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने, माजी उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, सुरेश गवळी, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे उपस्थित होते.

Dattatray Bharane-Harshvardhan Patil
Dhananjay Munde News : धनंजय मुंडेंना भेटून आलेले वळसे पाटील म्हणाले, ‘त्यांची प्रकृती उत्तम, काळजीचे कारण नाही; पण डिस्चार्जसंदर्भात...’

कोणतेही पद किंवा मिळालेली संधी, हे मिरवण्यासाठी नसून सर्वसामान्य गोरगरीब जनतेची कामे करण्यासाठी असते. त्यानुरूप लोकांनी ज्या विश्वासाने मला खुर्चीवर बसवले आहे, त्या विश्वासाला पात्र राहत येणाऱ्या दोन वर्षांत शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाहीही माजी राज्यमंत्री भरणे यांनी दिली.

Dattatray Bharane-Harshvardhan Patil
Laxman Jagtap News : पुन्हा निवडून येऊ की नाही? गॉडफादर लक्ष्मण जगतापांच्या निधनामुळे भाजपच्या नगरसेवकांना धास्ती

भरणे म्हणाले की, सन २१०४ पूर्वीचे इंदापूर आणि आताचे इंदापूर यात किती फरक झाला आहे, याचा विचार इंदापूरच्या जनतेने करावा. खरं कोण आणि खोटे कोण, हे ओळखावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Dattatray Bharane-Harshvardhan Patil
Congress News : मल्लिकार्जून खर्गे यांनी महाराष्ट्रातील या नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपल्याला मिळालेल्या मंत्रिपदाच्या माध्यमातून शहराच्या वाढीव भागात विकास कामे करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला, त्यामुळे इंदापूर शहराचा समतोल विकास साधला जात आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com