Pune Assembly Election : खेड तालुक्यातील लाडक्या बहिणी माझ्या पाठीशी; आमदार दिलीप मोहिते पाटील

खेड तालुक्यातील लाडक्या बहिणी माझ्या पाठीशी असून, त्यांच्याबरोबर तालुक्यातील विकासकामांमुळे समाधानी झालेले लाडके भाऊही येत्या २० तारखेला मतदानरूपी आशीर्वाद मला नक्की देणार
Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly ElectionSarkarnama
Published on
Updated on

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील लाडक्या बहिणी माझ्या पाठीशी असून, त्यांच्याबरोबर तालुक्यातील विकासकामांमुळे समाधानी झालेले लाडके भाऊही येत्या २० तारखेला मतदानरूपी आशीर्वाद मला नक्की देणार, असा विश्‍वास महायुतीचे उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केला.

मेदनकरवाडी (ता. खेड) येथे गुरुवारी (ता. ७) खानदेश परिवार आयोजित दीपावली सांज कार्यक्रमात मोहिते पाटील यांनी माता भगिनींशी संवाद साधला, तेव्हा ते बोलत होते. आमदार मोहिते म्हणाले, ‘‘खेड तालुक्यात राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेत १ लाख १७ हजार महिला पात्र ठरल्या असून, दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी १५०० रुपये जमा होतात.

या महिन्यापर्यंत त्यांच्या बँक खात्यात साडेसात हजार रुपये सरकारने जमा केले आहेत. त्यामुळे तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणी माझ्या पाठीशी आहेत. महायुतीचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेची रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये होणार आहे.

खेड तालुक्यातील लाडकी बहीण योजनेचा मी अध्यक्ष आहे. तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणी माझ्या पाठीशी आहेत. खेड-आळंदी विधानसभेची निवडणूक एकतर्फी होणार असून, विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा जिल्हा परिषद गट सोडला तर तालुक्यातील इतर गावांत प्रभाव नाही. त्यामुळे मी मोठ्या मताधिक्याने विजयी होणार आहे.’’

माझ्या माताभगिनी त्याग करून आणि काबाड कष्टातून प्रपंच उभा करतात. प्रपंचाचा गाडा हाकताना त्या आपल्या आवडीनिवडी, हौसमौज याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे मात्र त्यांचे सरकार आल्यावर राज्यात युती सरकारने सुरू केलेल्या सर्व योजना आम्ही बंद करू, असे सांगतात. त्यामुळे लाडकी बहीण योजना सुरू करणाऱ्या सरकारला मतदान करायचे, की योजना बंद करू म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मतदान करायचे, हे आता तालुक्यातील महिलांनी ठरवायचे आहे

-दिलीप मोहिते, उमेदवार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com