Ravindra Dhangekar : कसब्यासाठी सर्वाधिक निधी आणणार : आमदार रवींद्र धंगेकर

‘कसब्यात आमदार म्हणून मला काम करण्याची केवळ १६ महिने संधी मिळाली. विधानसभेत ३१६ प्रश्न आणि असंख्य लक्षवेधी सूचना उपस्थित केल्या. त्यातून अनेक प्रश्न मार्गी लागले.
Ravindra Dhangekar
Ravindra DhangekarSarkarnama
Published on
Updated on

पुणे : ‘‘कसब्यात आमदार म्हणून मला काम करण्याची केवळ १६ महिने संधी मिळाली. विधानसभेत ३१६ प्रश्न आणि असंख्य लक्षवेधी सूचना उपस्थित केल्या. त्यातून अनेक प्रश्न मार्गी लागले. पुढील पाच वर्षांत इतक्याच आक्रमकपणे काम करून कसब्यासाठी सर्वाधिक निधी आणला जाईल,’’ अशी ग्वाही आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिली.

आज सकाळी प्रभाग क्रमांक १९, लोहियानगरमधील सर्व गल्ल्या व एकबोटे कॉलनीत धंगेकर यांनी महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांसह प्रचार यात्रा काढली. त्यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी अविनाश बागवे, यासेर बागवे, युसूफ शेख, संजय गायकवाड, जुबेर दिल्लीवाला, हेमंत राजभोज, गणेश नलावडे, रवी पाटोळे, आयुब पठाण, विजया मोहिते, मनोज यादव उपस्थित होते.

धंगेकर म्हणाले, घर मालकांना देण्यात येणारी ४० टक्के कर सवलत रद्द केल्यामुळे लक्षवेधी उपस्थित केली. मध्यमवर्गीय व गरिबांची ५०० चौरस फुटाची घरे मिळकत करातून माफ करावी, यासाठी आवाज उठविला. रिक्षा चालक व मालकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापनेसाठी आग्रह धरला. पुण्याला २२ टीएमसी पाणी मिळण्यासाठी लक्षवेधी उपस्थित केली. ड्रग्ज तस्करी, अवैध पब आणि हुक्का बार संदर्भात आक्रमक भूमिका घेऊन पोलिसांना कारवाई करायला भाग पाडले. वाड्यांच्या पुनर्वसनासाठी कायमच आग्रही राहिलो.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com