भोर : पुणे जिल्हा बॅंकेची रणधुमाळी सुरु झाली आहे. बॅंकेच्या निवडणुकीसाठी (Pune District Bank Election) विद्यमान संचालक काँग्रेस नेते आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी अ गटातून आज सोमवारी (ता.6) उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेचे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांनी अ गटातूनच यापूर्वी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिंदे यांनी थोपटे यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चर्चेला उधाण आले आहे. (MLA Sangram Thopte files application for District Bank Election)
त्यातच विद्यान संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे भालचंद्र जगताप यांनी ड गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. सुरुवातीला जिल्हा बँकेची भोर तालुक्यातील निवडणूक गतवेळेप्रमाणे बिनविरोध होईल असे वाटत होते. मात्र, शिंदे यांच्या अर्जामुळे थोपटे यांना आव्हाण निर्माण झाले आहे. थोपटे यांनी अर्ज भरला त्या वेळी काँग्रेस प्रदेशचे उपाध्यक्ष देवीदास भंन्साळी, सरचिटणीस श्रीरंग चव्हाण, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती धनंजय वाडकर, तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, पोपट सुके, मदन खुटवड, ज्ञानेश्वर झोरे, किसन सोनवणे, मारुती गुजर, विकास कोंडे, दिनकर सरपाले व सुनिल लोहोकरे उपस्थित होते.
मागील जिल्हा बॅंक निवडणुकीच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कै. रघुनाथ किंद्रे यांनी माघार घेतल्याने आमदार थोपटे बिनविरोध संचालक झाले होते. मात्र, या वेळी शिवसेनेचे ज्ञानेश्वर शिंदे माघार घेणार का? हे पुढील काही दिवसात समजेल. मात्र, या मतदार संघात काही दिसापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये तु तु मै मै सुरु आहे. त्यामुळे शिंदे यांनी माघार घेतली नाही तर राष्ट्रवादी काय भूमिका घेणार हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या पार्श्वभूमीवर अ वर्गाची भोर तालुक्यातील ही निवड बिनविरोध पार पडण्याची शक्यताही राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. भोर तालुक्यात एकुण 75 सोसायटी असून त्यापैकी 73 सोसायटींचे मतदानाचे ठराव आले आहे. म्हणजे तालुक्यात अ वर्ग गटात 73 मतदार आहे. आतापर्यंत सोसायटी मतदारात काँग्रेसचे प्राबल्य राहिलेले आहे. सद्यस्थितीत काँग्रेसकडे 50, शिवसेनेकडे पाच आणि राष्ट्रवादीकडे 15 संस्था असल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.