Sunil Shelke Facebook Post: अजितदादांबरोबर गेलेले आमदार सुनील शेळकेंचे शरद पवारांवरील प्रेम असे झाले व्यक्त

Sunil Shelke News: आमदार सुनील शेळके यांच्या फेसबुक पोस्टची चर्चा रंगली आहे.
Sunil Shelke
Sunil Shelke Sarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस २ जुलैला दुभंगली. बंड करून अजित पवार हे समर्थकांसह भाजप-शिवसेनेच्या राज्य मंत्रीमंडळात सामील झाले. त्यानंतर शरद पवार यांनी आपला फोटो अजित पवार यांच्या गटाने वापरू नये, असे फर्मान काढले. मात्र, तरीही तो वापरला जात आहे. त्यामुळे आता खुद्द पवार वा त्यांच्या गटाकडून काय प्रतिक्रिया येते याची उत्सुकता आहे.

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तिन्ही आमदार अण्णा (पिंपरीचे अण्णा बनसोडे, खेडचे दिलीपअण्णा मोहिते-पाटील, मावळचे सुनील अण्णा शेळके) हे अजितदादांबरोबर गेले आहेत. पवारसाहेब हे आमचे दैवत असून त्यांच्याविषयी नितांत आदर आहे, असे तिघांनीही स्पष्ट केलेले आहे. त्यातील सुनीलअण्णांनी पवारसाहेबांचा फोटो त्यांनी तो अजित पवार गटाने वापरू नये, असे सांगूनही आज वापरला.

Sunil Shelke
BJP-Congress News : भाजप पदाधिकाऱ्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यालाच घातला 2 लाखांचा गंडा ; मुरबाडमध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

त्यांनी आपले (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अभिष्टचिंतनाच्या फेसबुकवरील पोस्टमध्ये तो घेतला आहे. त्यात एका बाजूला शरद पवार आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार आणि मध्ये तटकरे यांचा, तर खाली आमदार शेळकेंचा फोटो आहे. त्यातून आमदार शेळकेंचे शरद पवारांवर प्रेम कायम असल्याची चर्चा मावळात रंगली आहे.

शेळके हे २०१९ पर्यंत भाजपमध्य़े होते. अजित पवारांनी त्यांना त्यावेळी विधानसभा निवडणुकीला राष्ट्रवादीत आणले. त्यांनी इतिहास घडवला. मावळच्या भाजपच्या गडाला त्यांनी सुरुंग लावला. त्यावेळचे राज्यमंत्री भाजपचे बाळा ऊर्फ संजय भेगडे यांचा त्यांनी दणदणीत पराभव केला. भेगडेंची आमदारकीची हॅटट्रिक त्यांनी चुकविली. त्यानंतरही अगदी ग्रामपंचायत निवडणुकीपर्यंत त्यांचा हा धडाका कायम राहिल्याने ते अजितदादांच्या गळ्यातले ताईत बनलेले आहेत.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com