Pune Political News : ...अन आमदार सुनिल टिंगरे झाले निर्धास्त!

Sunil Tingre Vs Jagdish Mulik : महायुतीमुळे भाजपला सोडावी लागणार ताकदीची जागा, भाजप इच्छुकांच्या आशेवर पाणी...
Pune Political News :
Pune Political News : Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमधून एक गट बरोबर घेऊन सत्तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निर्णयामुळे स्थानिक पातळीवरील राजकारण बदलले आहे. अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आगामी विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक असलेल्या अनेकांच्या इच्छा आकांक्षाना सुरूंग लागले आहे. यामुळे आता स्थानिक पातळीवरील राजकारणाचे समीकरण अधिकच रंजक झाले आहे. (Latest Marathi News)

गेल्या पंचवार्षिकच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला अशी ओळख निर्माण झालेल्या वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढविण्याची तयारी करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर या मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी शरद पवार गटामध्ये सहभागी न होता, अजित पवार यांच्याबरोबर राहणे पसंत केले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

Pune Political News :
MLA Sunil Tingare News : आमदार टिंगरे यांनी उपोषणास्त्र उपासल्यानंतर मनपा प्रशासनाला आली जाग !

मागील विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे आमदार जगदीश मुळीक यांनी या मतदारसंघातून विजय मिळविला होता. त्यावेळी असलेल्या मोदी लाटेत शहरातील आठही मतदारसंघात भाजपचे कमळ फुलले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभेमध्येही पंतप्रधान मोदी यांची लाट असतानाही आठ पैकी सहा मतदारसंघात भाजपला विजय मिळविता आला. तर वडगावशेरी, हडपसर हे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. या मतदारसंघातून एकदा विजयी झालेले भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक हे आता लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्या दृष्टिने त्यांनी पावले उचलण्यास सुरूवात केली असून, शहरातील नागरिकांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रम ते घेतात. गेल्या महिन्यात संगमवाडी परिसरात बागेश्वर बाबा यांचा सत्संग हा त्याचाच एक भाग होता.

मुळीक हे आमदारकीची निवडणूक लढवित असताना त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यावेळचे आमदार बापूसाहेब पठारे यांना उमेदवारी दिली होती. तर सध्याचे विद्यमान आमदार असलेले सुनील टिंगरे यांनी त्यावेळी राष्ट्रवादीमधून बाहेर पडत मनसे अन् त्यानंतर अखेरच्या क्षणी शिवसेनेचे तिकीट मिळवून ही निवडणूक लढविली होती. त्यामध्ये टिंगरे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीचे उमेदवार बापूसाहेब पठारे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते.

Pune Political News :
Pune Vidhansabha Survey : नवा सर्व्हे आला समोर; भाजपा कसबा, वडगाव शेरी खेचून आणणार, कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर गमावणार !

त्यानंतर झालेल्या 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत टिंगरे यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षाचे तिकीट मिळवित भाजपचे आमदार जगदीश मुळीक यांचा पराभव केला. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मुळीक यांनी खासदारकीची तयारी सुरू केली आहे. गेल्या काही वर्षांपासून ते त्यादृष्टिने पावले टाकत आहेत.

भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार बापू पठारे आणि त्यांचा मुलगा सुरेंद्र पठारे विधानसभेसाठी इच्छुक आहे. मुळीक खासदारकीसाठी इच्छुक असल्याने भाजपकडून आपल्या घरातच तिकीट मिळेल असे चित्र होते. मात्र सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या घडामोडीमुळे या मतदार संघातील इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याने या भागातील इच्छूकांच्या महत्वकांक्षेवर पाणी फिरले आहे.

विद्यमान आमदार सुनील टिंगरे हे अजित पवार यांच्या गटातील असून त्यांनी अजित पवारांना पाठींबा दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. जो विद्यमान आमदार आहे ती जागा संबधित पक्षाला दिली जाईल, अशी भूमिका यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेली आहे. त्यामुळे वडगावशेरीचे आमदार टिंगरे निर्धास्त असल्याचे बोलले जात आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com