Suresh Dhas: अजितदादा तसे नव्हते, संतोष देशमुख हत्या आक्रोश मोर्चात सुरेश धस असे का म्हणाले?

Suresh Dhas on Ajit Pawar over Santosh Deshmukh Case: सुरेश धस यांनी मोर्चात संतोष देशमुख यांच्या आरोपींनी फाशी द्या, अशी मागणी केली.या प्रकरणातील आरोपींना कोण पाठिंशी घालत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Suresh Dhas on Ajit Pawar
Suresh Dhas on Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं राजकारण तापलं आहे. देशमुख यांच्या आरोपींना कठोर शिक्षा द्या, या मागणीसाठी राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे. आज पुण्यात आक्रोश मोर्चाच आयोजन करण्यात आलं. सर्वपक्षीय नेत्यांसोबतच संतोष देशमुख यांचं कुटुंब मोर्चाला उपस्थित होते.

आमदार सुरेश धस यांनी मोर्चात संतोष देशमुख यांच्या आरोपींनी फाशी द्या, अशी मागणी केली.या प्रकरणातील आरोपींना कोण पाठिंशी घालत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती करीत सुरेश धस यांनी आरोपींनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Suresh Dhas on Ajit Pawar
Manoj Jarange: निरोप आला अन् जरांगे पाटील मोर्चातून माघारी फिरले!

अजितदादा या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप अप्रत्यक्षपणे धस यांनी केला. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा यांच्यासोबत १४ ते १५ वर्ष होतो, अजितदादा तसे नव्हते, असे सुरेश धस यांनी सांगितले. अजितदादाचं कान भरणं सुरु आहे, असे धस म्हणाले.

देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. 'वालूबाबा' असा उल्लेख करीत भाजप आमदार सुरेश धस यांनी देशमुखांच्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

या मोर्चाला पुण्यातीलच खासदार आमदारांनी पाठ फिरवली. त्यावर सुरेश धस यांनी निशाणा साधला. मराठा आंदोलक मनोज जरांगे, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, ज्योती मेटे, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते, मात्र पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना मोर्चाकडे पाठ फिरवल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

एसआयटीत 'चालूबाबा' सामील झाले

संतोष देशमुख हत्येप्रकरणी आम्ही जेवढ्या मागण्या केल्या होत्या, तेवढ्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्या. पण सरपंच हत्येप्रकरणी जी SIT स्थापन केली आहे, त्या SITमध्ये वालूकाकाचे (वाल्मिक कराड) 'चालूबाबा' सामील झाले आहेत. यामध्ये कोणाचा दोष नाही आहे. कारण केज पोलीस ठाण्यांतर्गत पोलिसांनी यादी पाठवण्यास सांगितली होती. CIDने ती यादी पाठवली. ही यादी गृहमंत्रालयाकडे गेली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावर सही केली” असे सांगत सुरेश धसांनी महायुती सरकारला घरचा आहेर दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com