MNS Kishor Shinde : 'आम्ही महायुतीचा भाग नाही आहोत, राजसाहेबांनी...' ; मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं!

MNS on Pune Vidhan Sabha Election : 'आम्ही पुणे शहरातील, पिंपरी चिंचवडमधील सगळ्या जागा लढवणार आहोत', असंही किशोर शिंदे म्हणाले आहेत.
MNS Kishor Shinde
MNS Kishor Shinde Sarkarnama
Published on
Updated on

MNS and Vidhan Sabha Election : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे राज्याती राजकीय वातावरणही तापत आहे. सर्वच पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडूनही जागा वाटपाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

असे असताना मनसेने मात्र विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढवण्याची तयारी केलेली आहे. काही दिवसांपूर्वीच मनसे प्रमुख राज ठाकरेंनी याबाबत सूतोवाच केलं होतं. त्यानंतर आता मनसेचे सरचिटणीस किशोर शिंदे यांचंही एक विधान समोर आलं आहे.

"आम्ही महायुतीचा भाग नाही आहोत, राजसाहेबांनी(Raj Thackeray) स्वबळाचा नारा दिला आहे, आम्ही त्यांच्या आदेशानुसार काम करणार आहोत. आम्ही पुणे शहरातील, पिंपरी-चिंचवडमधील सगळ्या जागा लढवणार आहोत. इच्छुक उमेदवारांनी आपली इच्छा साहेबांना सांगितलं आहे, अर्थात साहेब कोणाला तिकीट द्यायचं हे साहेबच ठरवतील आणि तो निर्णय आमच्यासाठी अंतिम आहे. " असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस किशोर शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

MNS Kishor Shinde
Video Raj Thackeray : "याला सरकार चालवणे म्हणतात का?" राज ठाकरे भडकले

एकूणच लोकसभा निवडणुकीला महायुतीला पाठींबा देणाऱ्या मनसेने आगामी विधानसभा निवडणूक(Vidhan Sabha Election) स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पक्षाच्या राज्यव्यापी मेळाव्यात विधानसभेला 225 जागा लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

MNS Kishor Shinde
Raj Thackeray : राज ठाकरेंचा मोठा निर्णय, विधानसभा निवडणूक स्वबळावरच

तर मनसेने(MNS) 225 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची घोषणा केली असली तरी त्यांची ताकद ही महानगरांध्येच आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये मनसेच्या नेत्यांकडून निवडणूक लढण्याची तयारी देखील केली जात आहे. त्यामुळे मुंबईमध्ये राज ठाकरे यांच्या उमेदवारांमुळे मराठी मतांमध्ये फूट पडून त्याचा फटका उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला बसण्याचा धोका आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com