MNS : वसंत मोरेंची बैठकीला दांडी ; मोरे अन् पदाधिकाऱ्यांतील संघर्ष तीव्र

बैठकीला उपस्थित राहण्याबाबत कोणताही दूरध्वनी नव्हता.
Vasant More News, MNS News, Political News
Vasant More News, MNS News, Political News sarkarnama
Published on
Updated on

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुकाणू समितीच्या बैठक नुकतीच झाली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मनसेचे (mns) माजी अध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) गैरहजर होते. मोरेंना बैठकीला डावलण्यात आल्याची चर्चा मनसे कार्यकर्त्यांमध्ये आहे. (Vasant More news update)

महापालिका निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती ठरविण्यासाठी शहर कार्यालयात सातत्याने बैठका होत आहेत. याच पार्श्वभूमीवर रविवारी पक्षाच्या सुकाणू समितीची बैठक झाली. विधानसभानिहाय प्रभागातील इच्छुकांच्या प्राथमिक मुलाखती घेण्याचा कार्यक्रम पक्षाकडून सुरू झाला आहे.

"समाजमाध्यमातून सुकाणू समिती बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते. अलीकडे सुकाणू समितीच्या बैठकीची कार्यपद्धती बदलली आहे. बैठकीचा निरोप समाजमाध्यमातून दिला जातो. तसा तो मला मिळाला. बैठकीला उपस्थित राहण्याबाबत कोणताही दूरध्वनी नव्हता. मात्र अन्य कार्यक्रमांमुळे मी बैठकीला नव्हतो," असे वसंत मोरे यांनी सांगितले.

"पदाधिकारी डावलत असून राज ठाकरे शहर कार्यालयात येत नाहीत, तोपर्यंत शहर कार्यालयात जाणार नाही," अशी स्पष्ट भूमिका वसंत मोरे यांनी जाहीर केली होती. तेव्हापासून मोरे आणि मनसेतील पदाधिकारी यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे.

Vasant More News, MNS News, Political News
महाराष्ट्रात ‘चौथ्या लाटे’ ची भीती ; मास्क बंधनकारक करण्याचे ठाकरेंचे संकेत

या बैठकीबाबत प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे म्हणाले, "निवडणूक तयारीच्या संदर्भात बैठक घेण्यात आली. निवडणूकीचा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. या बैठकीला कोण उपस्थित नव्हते, याबाबत मला बोलायचे नाही,"

मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निर्णयावर वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केल्यातनंतर पक्षाच्या शहराध्यक्ष पदावरून त्यांना हटवण्यात आले. माजी नगरसेवक व मोरे यांचे जवळचे मित्र साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.

Vasant More News, MNS News, Political News
महापालिका निवडणुकीत मनसेचा 'भोंगा' वाजणार का ?

या पार्श्वभूमीवर वसंत मोरे कुठल्या पक्षात जाणार याबाबत चर्चा रंगल्या होत्या. तेव्हा "मी मनसेतच आहे.मनसैनिक म्हणून मी काम करीत राहणार," असे मोरे यांनी स्पष्ट केले होते. तीन दिवसापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची वसंत मोरेंनी भेट घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, तर शनिवारी राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्यांसोबत मोरे यांनी दुचाकीवरुन फेरफटका मारल्याने मोरेंच्या मनात नेमकं काय सुरु आहे, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com