Vasant More News : वसंत मोरेंविषयी मनसेच्या नेत्याचे मोठे विधान : म्हणाले, ‘वसंत मोरे ताकदवान हे....’

वसंत मोरे यांनी माध्यमाशी बोलण्याअगोदर कोअर कमिटीमध्ये बोलावं, अशी माझी मोरे यांना विनंती आहे.
Vasant More-Babu Wagaskar
Vasant More-Babu WagaskarSarkarnama
Published on
Updated on

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) हे पक्षात नाराजी असल्याचे उघड गुपित आहे. मोरे यांनी आपली नाराजी अनेकदा बोलून दाखवली आहे. पण, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष बाबू वागस्कर (Babu Wagaskar) यांनी मोरे यांच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे विधान केले आहे. तसेच, वसंत मोरे यांना आलेल्या ऑफर माध्यमांनी तपासाव्यात, असेही वागस्कर यांनी म्हटले आहे. (MNS leader's big statement about Vasant More)

मनसेचे बाबू वागस्कर म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्र दौरा आणि कोअर कमिटीबाबत चर्चा झाली. माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्याविषयी या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. बैठकीबाबत वसंत मोरे चुकीचे बोलत आहेत, फक्त पक्षाबाबत चर्चा झाली.

Vasant More-Babu Wagaskar
Maharashtra-Karnataka : सीमाप्रश्न पेटला; सोलापुरात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला

वसंत मोरे यांनी माध्यमाशी बोलण्याअगोदर कोअर कमिटीमध्ये बोलावं, अशी माझी मोरे यांना विनंती आहे. मनसेच्या बैठका ह्या पक्षाच्या कार्यलयातच होणार. दुसरीकडे होणार नाहीत. वसंत मोरे नाराज असलतील त्यांनी आमच्याशी चर्चा करावी, असे आवाहनही वागस्कर यांनी केले आहे.

Vasant More-Babu Wagaskar
Shahajibapu Patil Audio Cilp : 'गावात धिंंगाणा करा...बापू काय येडा आहे का?' : शहाजीबापू पाटलांची पुन्हा डायलॉगबाजी

मनसेच्या पुणे माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीलेश माझिरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ते आता मनसेत नाहीत, त्यामुळे त्यांना किती गांभीर्याने घ्यायचं, हे तुम्हीच ठरवा, असेही वागस्कर यांनी स्पष्ट केले.

Vasant More-Babu Wagaskar
MNS Leader Join's Shivsena: मनसेला पुण्यात पुन्हा धक्का : शिरूरमधील नेत्याचा तडकाफडकी शिवसेनेत प्रवेश

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून वसंत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत आलेल्या ऑफरवरही वागस्कर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, वसंत मोरे यांना आलेल्या ऑफर जरा माध्यमांनी तपासून पाहव्यात. तसेच वसंत मोरे ताकदवान, हे ठरवणारे तुम्हीच आहात, असा टोलाही त्यांनी माध्यमांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com