पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज औरंगाबाद (Aurangabad) येथील सभेसाठी रवाना होत आहेत. महाराष्ट्र दिनी (१ मे) होणाऱ्या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. हजारों कार्यकर्त्यांसह राज ठाकरे हे औरंगाबादकडे रवाना होत आहेत. पुण्यात त्यांच्या गाडीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
मशिदीवरील भोंगे उतरविण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर काही गुन्हे दाखल झाले तर मनसैनिकांना संरक्षण देण्यासाठी दोन हजार वकीलांची (lawyers) फौज तयार असल्याचे सुत्रांनी सांगितले. तीन मेला होणाऱ्या महाआरतीसाठी मनसेकडून वकील नेमण्यात आले आहेत.
औरंगाबादला रवाना होण्याआधी पुण्यात आज सकाळी त्यांच्या राजमहाल या निवासस्थानी गुरुजींच्या माध्यमातून मंत्रोच्चारासह आशीर्वाद असा धार्मिक कार्यक्रम झाला. त्यासाठी मनसेने पोस्टरही छापलं होतं. यावर हिंदूजननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी शेकडो गुरूजन,असा मजकूर छापण्यात आला आहे. पुण्यातून निघाल्यानंतर वढू तुळापूर इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार आहे, त्यानंतर नगरमार्गे ते औरंगाबादला जाणार आहेत.
राज ठाकरे यांची औरंगाबादची सभा जाहीर झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे.सभेला परवानगी मिळाल्यानंतर आता या सभेत राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी औरंगाबादचे राजकीय, सामाजिक वातावरण मात्र चांगलेच ढवळून निघाले आहे.
राज ठाकरे यांना औरंगाबादचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील (imtiyaj jaleel)यांनी इफ्तार पार्टीचं निमंत्रण दिलं आहे."माझा धर्म, माझी संस्कृती आणि मला लहानपणापासून मिळालेली शिकवण हेच सांगते की राज ठाकरे आमचे पाहुणे आहेत. ते आमच्या शहरात आले आहेत, त्यामुळे सभेला जाण्याआधी मी त्यांना इफ्तार पार्टीसाठी निमंत्रीत केलं आहे," असे जलील म्हणाले.
राज ठाकरेंनी ईदच्या दिवशी भेटीसाठी यावं असं निमंत्रण इम्तियाज जलील यांनी केलं आहे. पण जलील यांच्या या आमंत्रणाबाबत राज ठाकरे किंवा मनसेकडून कुठलीही प्रतिक्रिया अद्यापपर्यंत देण्यात आलेली नाही.इम्तियाज जलील यांच्या इफ्तार पार्टीचं निमंत्रण राज ठाकरे स्वीकारतील का? असा प्रश्न सध्या विचारला जात आहेत. इम्तियाज जलील यांचे राज ठाकरे यांना इफ्ताल पार्टीला निमंत्रण देणे हा देखील असाच एक वेगळा राजकीय पवित्रा असल्याचे मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.