मनसेने कोथरूडची परतफेड पर्वतीत केली....राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांना पाठिंबा

राष्ट्रवादी काॅंग्रेसने मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना कोथरूडमध्ये पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्याची परतफेड मनसेने पर्वती मतदारसंघात केली आहे. त्यामुळे येथील निवडणूक रंगतदार होणार आहे.
मनसेने कोथरूडची परतफेड पर्वतीत केली....राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांना पाठिंबा

सहकारनगर : समाज घडवण्यासाठी शिक्षिका म्हणून काम करीत राजकारणापेक्षा समाज कार्याला महत्व देणाऱ्या पर्वती भागातील स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या  पर्वती विधानसभेतील महाआधाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार अश्विनी कदम यांना मनसेने जाहीर पाठींबा दिला.

या पाठींबामध्ये मनसेचे अनिल शिदोरे व बाबू  वागस्कर यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, निलेश ढमढेरे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष महेश शिंदे, नगरसेवक विशाल तांबे, राष्ट्रवादी पर्वती अध्यक्ष नितीन कदम, तसेच मनसेचे पर्वती उपविभाग प्रमुख जयराज लांडगे, विभागप्रमुख राहुल गवळी, सतीश तावरे,सनी जगताप, विकी अमराळे, सनी खरात, संतोष चव्हाण, कुशल शिंदे, अभिजित टेंबेकर, विशाल शिंदे,महेश जाधव आदी मनसेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी जयराज लांडगे(मनसे उप विभाग प्रमुख)म्हणाले, पर्वतीमध्ये मनसेने दिलेल्या पाठींब्यामुळे अश्विनी कदम यांचा विजय निश्चित आहे. या विजयामध्ये मनसेचा सिंहाचा वाटा असणार आहे. तसेच उच्च शिक्षित  असणाऱ्या शिक्षिका अश्विनी कदम यांना जनतेचा सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे.

यावेळीनी कदम म्हणल्या, मनसेचा मिळालेला जाहीर पाठिंबा यांचा आम्हाला नक्कीच फायदा होणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मनापासून आभार मानते. त्याबरोबर ज्येष्ठ नागरिकांचा वाढता पाठिंबा आणि सर्व धर्मीय बहुजन समाज घटकांनी दिलेला पाठींबा यामुळे पर्वतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार आहे. पर्वतीला जो बकालपणा आला आहे तो दूर करण्यासाठी आधाडीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com