Jamir Syed
Jamir Syed Sarkarnama

मनसेची गळती थांबेना : राज ठाकरेंच्या विधानावर नाराजी व्यक्त करत दौंड शहराध्यक्षाचा राजीनामा

महाराष्ट्र दिनी (ता. १ मे) औरंगाबाद येथे राज ठाकरे यांनी अजान सुरू असताना केलेले विधान मुस्लिम समाजाची भावना दुखावणारे आहे.
Published on

दौंड (जि. पुणे) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मशिदींवरील भोंगे काढण्याची मागणी व त्यानंतर औरंगाबाद येथे केलेल्या विधानावर नाराजी व्यक्त करीत पुणे जिल्ह्यातील दौंडचे (Daund) मनसे शहराध्यक्ष जमीर सय्यद यांनी राजीनामा दिला आहे. (MNS's Daund city president Jamir Syed resigns)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. सुधीर पाटसकर यांच्याकडे जमीर सय्यद यांनी राजीनामा सादर केला आहे. राज ठाकरे यांची भोंग्यासंबंधीची भूमिका चुकीची असल्याचे सांगत जे पूर्वीपासून चालू आहे, ते चालू राहिले पाहिजे. त्याचबरोबर महाराष्ट्र दिनी (ता. १ मे) औरंगाबाद येथे राज ठाकरे यांनी अजान सुरू असताना केलेले विधान मुस्लिम समाजाची भावना दुखावणारे आहे. समाजातील ज्येष्ठांसह सर्वांबरोबर चर्चा केल्यानंतर आणि समाजाकडून दबाव वाढल्याने राजीनामा दिल्याचे जमीर सय्यद यांनी सांगितले.

Jamir Syed
'आम्ही त्यांना भावासारखं मानलं; मात्र ते आमच्याशी धूर्तपणे वागले'

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सलग १६ वर्षे सक्रिय असलेले जमीर सय्यद यांनी मनसे वाहतूक सेनेचे शहराध्यक्षपद, मनसे एसटी कामगार सेनेचे पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून काम पाहिले आहे. मागील तीन वर्षांपासून जमीर सय्यद हे दौंडचे शहराध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. जमीर सय्यद यांचे बंधू दहा वर्षे दौंड नगरपालिकेचे सदस्य होते.

Jamir Syed
राज ठाकरे यांचे बोलणे कायद्याच्या कचाट्यात येऊ शकते.... पण? : उल्हास बापटांनी दिला हा सल्ला...

मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. सुधीर पाटसकर यांनी जमीर सय्यद यांचा राजीनामा मिळाला नसल्याचे सांगितले. तसेच, जे मुस्लिमधार्जिणे लोक आहेत, त्यांचाच भोंगा आता फार वाढला आहे. मुस्लीम समाज हा जुन्या रूढी-चालीरीती व कालबाह्य परंपरेबद्दल बोलायला कचरतो, असेही विधान पाटसकर यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com