पुणे : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षानी कबंर कसली आहे. या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादी काँग्रेसनेही स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. मात्र स्टार प्रचारकांच्या यादीतून खासदार अमोल कोल्हे यांना वगळण्यात आलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. (NCP Amol kolhe Latest News)
राष्ट्रवादी (NCP) आता आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत ताकदीने उतरणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी करण्यात आली असून यासाठी राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. मात्र, या यादीमध्ये खासदार डॅा. कोल्हे (Amol Kolhe) यांचं नाव नाही. त्यामुळे कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज तर नाहीत ना? अशाही चर्चा रंगल्या आहेत.
स्टार प्रचारकांच्या यादीत कोण?
गुजरात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने तीन जागेवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी तब्बल ३१ जणांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. या ३१ स्टार प्रचारकामध्ये अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावे आहेत. मात्र, खासदार कोल्हेंचे नाव वगळण्यात आले आहे.
खासदार कोल्हेंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका पडद्यावर साकारल्याने महाराष्ट्रासह राज्याबाहेर देखील त्यांचा चाहतावर्ग आहे. यामुळे त्यांचं या यादीत नाव असेल, असे अनेकांना वाटले होते. मात्र प्रसिद्ध झालेल्या यादीत त्यांच नावं नसल्याने अनेकांनी अश्चर्य व्यक्त केलं आहे.
दरम्यान, नुकतेच शिर्डीमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिराला देखील खासदार कोल्हेंनी पाठ फिरवली होती. त्यामुळे कोल्हे राष्ट्रवादीत नाराज तर नाही ना?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
त्यानंतर आता पुन्हा कोल्हे यांचं नाव राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आल्याने,चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान कोल्हेंना स्टार प्रचारकांच्या यादीतून का वगळलं? याबाबत राष्ट्रवादीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यावर आता कोल्हे काय प्रतिक्रिया देतात हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.