PCMC News : प्रशासक राजवटीत कामे मार्गी लावण्यासाठी माजी नगरसेवकांना आमदार, खासदारांचा आधार

Pimpri-Chinchwad Problems : नागरी समस्या सुटत नसल्याने माजी नगरसेवक वैतागले
Ashwini Jagtap meeting with PCMC Administrator
Ashwini Jagtap meeting with PCMC AdministratorSarkarnama
Published on
Updated on

PCMC Administrator and MLA : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुमारे वर्षभरापासून प्रशासकांचा कारभार सुरु आहे. या प्रशासकांच्या कार्यकाळात नागरी समस्या तातडीने मार्गी लागत नसल्याचा आरोप माजी नगरसेवक वारंवार करत आहेत. त्यामुळे आपल्या प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी माजी नगरसेवक आता आमदार, खासदारांची मदत घेऊ लागले आहेत.

Ashwini Jagtap meeting with PCMC Administrator
Sharad Pawar News : ठाकरेंशी युती; आता राष्ट्रवादी अन् वंचितचे एक पाऊल पुढे...

माजी नगरसेवक व पदाधिकारी हे प्रशासक तथा पालिका आयुक्त शेखर सिंह (Shekhar Singh) यांच्या कारभारावर नाखूष आहेत. त्यामुळे ते आपल्या पक्षाच्या आमदारांमार्फत आता प्रभागातील कामे मार्गी लावून घेण्याचा प्रयत्न माजी नगरसेवक करताना दिसत आहेत. मात्र, त्या प्रयत्नांनाही अपेक्षित यश मिळत नसल्याचे दिसून आले आहे. आयुक्त हे कुठलेही काम करताना उत्साहच दाखवित नाहीत, अशी नाराजी गत सत्ताधारी भाजपच्या एका माजी नगरसेविकेने 'सरकारनामा'कडे व्यक्त केली.

Ashwini Jagtap meeting with PCMC Administrator
Sanjay Raut in Daund : १४४ कलम लावूनही संजय राऊत कारखान्यावर गेलेच! आता दौंडमध्ये धडाडणार तोफ, निशाण्यावर कोण?

भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी आपल्या मतदारसंघातील माजी नगरसेवकांच्या प्रलंबित कामांबाबत मंगळवारी (ता. २५) शेखर सिंह यांच्याबरोबर बैठक घेतली. त्यानंतर शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनीही पिंपरी आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघांतील रखडलेल्या नागरी प्रश्नांचा आढावा आयुक्तांबरोबर घेतला.

चिंचवडच्या भाजप आमदार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी बुधवारी (ता. २६) मतदारसंघातील पक्षाच्या माजी नगरसेवकांसह प्रशासकांबरोबर आढावा बैठक घेतली. यावेळी उपस्थित नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील खोळंबलेल्या कामांचा पाढाच वाचला. त्यावर संबंधित कामे मार्गी लावण्याचे आश्वासन प्रशासकांनी दिले. मात्र, त्यांची देहबोली पाहता ही कामे लगेचच ते सोडवतील असे दिसत नाही, अशी प्रतिक्रिया या बैठकीला उपस्थित असलेल्या भाजपच्या नगसेविकेने दिली.

Ashwini Jagtap meeting with PCMC Administrator
Kannad APMC Election : भांडवलदार, कंत्राटदार नेत्यांनी बाजार समिती भकास केली, त्यांना हद्दपार करा..

चिंचवडसह (Chinchwad) शहरातील २१ रखडलेल्या कामांची आणि मागण्यांची यादी यावेळी आमदार जगतापांनी प्रशासकांना दिली. त्यात नव्याने लागू केलेला ७२० रुपयांचा घरटी उपभोक्ता घर (कचरा विलगीकरण शुल्क) रद्द करण्याची सूचना करण्यात आली. तसेच दिवसाआड पाणीपुरवठा होत असूनही कमी दाबाने ते मिळत असल्याची तक्रारही आहे. दरम्यान, किवळेत होर्डिंग दुर्घटनेत चार बळी गेले आहेत. त्या पार्श्वभूमिवर शहरातील सर्वच होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अनधिकृत फलक काढण्याची मागणीही यावेळी केली गेली. स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करून थेरगाव रुग्णालयात कर्करोग युनीट सुरु करा,असेही सांगण्यात आले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com