पावसातली सभा गाजली पण त्या निवडणुकीच्या मतमोजणीलाही मी गेलो नाही...

साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील (Srinivas Patil) यांनी आठवणींना उजाळा दिला.
Sharad Pawar, Srinivas Patil
Sharad Pawar, Srinivas Patilsarkarnama

पुणे : मी ३४ वर्ष सरकारी नोकरी केली. १९९९ मध्ये शरद पवारांनी (Sharad Pawar) बोलावले आणि सांगितले राजीनामा दे. राजीनामा दिला, त्यानंतर विचारले काय करणार, मी काहीच म्हटले नाही. त्यांनी सांगितले जा दोनचार जॅकेट आणि टोप्या शिव. एवढ्या सामग्रीवर राजकारणात प्रवेश केला. पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, अशी राजकारणातील वाटचाल सुरू, अशा शब्दांत साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील (Srinivas Patil) यांनी आठवणींना उजाळा दिला.

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभा यांच्या वतीने श्रीनिवास पाटील आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचा सत्कार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) आदी मान्यवर उपस्थित होते. पाटील यांनी आपली जीवनकथा या वेळी ऐकवली. तसेच मित्र म्हणून पवार कसे पाठीशी उभे राहिले, याचा अनुभव सांगितला.

Sharad Pawar, Srinivas Patil
सुशीलकुमार शिंदेंचे तिकिट कापले आणि मला रडू कोसळले : पवारांनी सांगितला हृद्य प्रसंग

ते म्हणाले, शरद पवार हे पौर्णिमेचा चंद्र आहेत. ते आमच्या बरोबर आहेत. ते म्हणतील तिथे उडी मारायची. मी 1999 मध्ये सचिव म्हणून काम करत असताना त्यांचा मला फोन आला. त्यांनी राजीनामा द्यायला सांगितले आणि दोनचार जॅकेट शिवायला सांगितले. त्यांनी मला थेट खासदारकीसाठी उभे केले. 1999, 2004 असा दोनदा खासदार झालो. त्यानंतर मला राज्यपाल केले. मला वाटले आता संपले. मात्र, त्यानंतर पुन्हा 2019 मध्ये फोन आला. तेव्हाही विचारले. काय करतो? मी सांगितले काही नाही. मला कागदपत्रे जमा करायला सांगितली आणि साताऱ्यातून लोकसभेसाठी अर्ज भरायला लावले.''

Sharad Pawar, Srinivas Patil
मोठी बातमी : मोदींच्या पुणे दौऱ्यात उद्धव ठाकरे येणार नाहीत... या नेत्यावर जबाबदारी

उदयनराजे यांच्या विरोधातील या निवडणुकीतील गाजलेल्या पावसाच्या सभेचाही अनुभव पाटील यांनी या वेळी सांगितला. ``आम्ही मल्हारपेठ येथील सभा उरकून साताऱ्याच्या सभेसाठी चाललो होतो. त्यावेळी पावसाची भूरभूर सुरू होती. साताऱ्यात आल्यावर धो धो पाऊस सुरू झाला. त्या वेळी पवारांनी मला भाषण करायला सांगितले. पावसाचे वातावरण पाहून मी भाषण कवितेद्वारे केले. ढगाला लागली कळ, 'पाणी थेंब थेंब गळ आणि तुमची सारी मत मला मिळं', असे समोरच्या गर्दीला सांगितले.`` पाटील यांच्या या वाक्यावर सभागृहात एकच हशा पिकला. मी निवडणूक लढवली. पण मतमोजणीला गेलो नाही. मुलाला पाठवले, सगळे व्यवस्थित झाले. हा सारा सन्मान पवार यांच्यामुळे मिळाला, असेही पाटील यांनी कृतज्ञनेते सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com