Shrirang Barne News : कुणीतरी विरोधी उमेदवार असेल; पण २०२४ ला मीच पुन्हा निवडून येईन : खासदार बारणे

Sanjay Raut, Shrirang Barne News : पिंपरी-चिंचवडमध्येही संजय राऊतांचा आज जाहीर निषेध करण्यातल आला.
Shrirang Barne News
Shrirang Barne NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad News : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना काल (ता.२) पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पूत्र, कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता ते ऑन कॅमेरा थुंकले. त्यांच्या या कृतीवर संतप्त प्रतिक्रिया राज्यभरात उमटत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्येही राऊतांचा आज जाहीर निषेध करण्यातल आला.

मावळचे शिवसेना (शिंदे) खासदार श्रीरंग तथा अप्पा बारणे यांनी राऊत यांच्या या कृतीचा पिंपरीत (Pimpri-Chinchwad) पत्रकापरिषद घेऊन जाहीर निषेध केला. त्यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला. राऊतांचे हे वर्तन खासदाराला अशोभनीय, लज्जास्पद असल्याचे ते म्हणाले. त्यांना ग (गर्व) ची बाधा झाली असून त्यातून त्यांनी द्वेषाची खालची पातळी गाठली आहे, अशी टीका त्यांनी केली. हा प्रकार महाराष्ट्रातील संस्कृतीला न शोभणारा असल्याने जनताही तो खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Shrirang Barne News
Pankaja Munde : मी माझ्या नेत्यांना भेटणार अन्...; पंकजा मुंडेंना व्यक्त केली मनातील खदखद

मावळ लोकसभा २०२४ ला आघाडीत राष्ट्रवादीकडे (NCP) घेण्याची मागणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पक्षाच्या नेत्यांकडे मुंबईत केली. तेथून काही उमेदवारांची नावेही घेतली जात आहेत. त्याकडे गांभीर्याने न पाहता आपणच पुन्हा उमेदवार २०२४ ला असणार असून विजयीही होणार असल्याचा दावा खा. बारणे यांनी यावेळी केला. कोण, तरी विरोधी उमेदवार असेल, अशी खिल्ली त्यांनी उडवली. माझ्यासमोर कोण उमेदवार आहे, हे पाहून मी निवडणूक लढवित नाही, असे ते म्हणाले.

Shrirang Barne News
Pankaja Munde News : पंकजा मुंडेंची नाराजी भाजपला अडचणीत आणू शकते?

तसेच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कामे करीत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मावळमधून भाजपनेही (BJP) तयारी सुरु केली असून तेथे समन्वयक नेमले आहेत, यावर बोलताना प्रत्येक पक्षाला आपली संघटना बांधण्याचा आणि तो वाढविण्याचा अधिकार आहे, असे उत्तर त्यांनी दिले. गतवेळी भाजपची आपल्या विजयात मोठी मदत झाल्याचे त्यांनी कबूल केले. तसेच यावेळीही भाजपसह शिंदे शिवसेना लोकसभा निवडणूक एकत्र लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com