Pune News : इंदापूरमधील एका कार्यक्रमातून खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. "कोणतंही नातं पंधराशे रुपयांनी विकत घ्यायचं नसतं", असा टोला खासदार सुळे यांनी म्हणत महायुतीमधील नेत्यांवर निशाणा साधला.
इंदापूरमधील सोनाई प्रतिष्ठानच्यावतीने मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 63 विवाह मोठ्या दिमाखात पार पडले. सोनई प्रतिष्ठानचे प्रमुख दशरथ माने यांनी स्वागत केले. प्रवीण माने यांनी प्रास्ताविक केले. खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रोहित पवार (Rohit Pawar), आमदार संजय जगताप, उत्तमराव जानकर, प्रदीप गारटकर, मेहबूब शेख, आप्पासाहेब जगदाळे उपस्थित होते.
खासदार सुळे (Supriya Sule) यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याचा देखणा कार्यक्रमाबद्दल माने कुटुंबियांचे कौतुक केले. तसंच खूप आशीर्वाद मिळत असल्याचे सांगितले. माने आणि पवार कुटुंबियांचे पाच दशकाचे ऋणानुबंध आहेत. निवडणुका येतात आणि जातात जातात, यामध्ये फार अडकायचे नसते. नाती जपायचे असतात. 'हवा बदल रही है', असा सूचक इशारा देत स्टेजवर नसलेले देखील आपल्याजवळ येतील, असे सांगितले. सुप्रिया सुळे यांनी यावेळी महायुती सरकारला 'लाडकी बहीण योजने'वर कोपरखळी मारली. कोणतंही नातं पंधराशे रुपयांनी विकत घ्यायचं नसत, असा टोला खासदार सुळे यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. आमदार पवार यांनी यावेळी भाषणात जोरदार टोलेबाजी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेवर टीका केली. अजित पवार यांनी यात्रेचा रंग गुलाबी आहे. हा गुलाबी रंगाचा धागा पकडत, सध्या राज्यात गुलाबी गँग फिरत असून, महिलांना दमदाटी करत करून, पैसे देऊन गर्दी जमवत आहे, असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.