एमपीएससीच्या विद्यार्थ्याची पुण्यात पुन्हा आत्महत्या

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याची ही दुसरी वेळ आहे.
amar mohite
amar mohitesarkarnama
Published on
Updated on

पुणे ः राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची (mpsc) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने शनिवारी (ता. १५ जानेवारी) पुण्यातील सदाशिव पेठेत आत्महत्या केली आहे. अमर मोहिते असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा सांगलीचा आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे तो पीएसआयच्या फिजिकलमधून बाहेर पडला होता, तेव्हापासून तो नैराशात होता. (MPSC student commits suicide again in Pune)

दरम्यान, पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी पुण्यातील स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर आज सांगलीच्या अमर मोहिते नावाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.

amar mohite
ईश्वर सातत्याने भाजपच्या बाजूने

अमर मोहिते हा मूळचा सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो अभ्यासासाठी पुण्यात आला होता. तो पुण्यातील सदाशिव पेठेतील हॉस्टेलमध्ये राहत होता. मोहिते पीएसआय फिजिकलची तयारी करत होता. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे पीएसआयच्या फिजिकलमधून अमर मोहिते हा बाहेर पडला होता. तेव्हापासून तो कायम स्ट्रेसमध्ये होता.

amar mohite
प्रश्न विचारायला नाही सोडवायला अक्कल लागते; चित्रा वाघांचा मुख्यमंत्र्यांना टोला

पीएसआयच्या फिजिकलमधून बाहेर पडल्यानंतर अमर मोहिते हा नैराशात गेला होता. त्यातच कोरोनाच्या काळात एमपीएससीची परीक्षाही अनेकदा रद्द करण्यात आली. तसेच, ती परीक्षा पुढे ढकलावी लागली आहे. त्याचा फटका अनेक विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यातूनच नैराशात असलेल्या अमर मोहिते याने आज आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे आढळून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com