मुंबई : समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांची प्रकृतीबद्दल अपडेट समोर आली आहे. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुलायम यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालय प्रशासनाने हेल्थ बुलेटिन जारी केले आहे. मुलायमसिंह यादव यांची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. ऑक्सिजन पातळी खाली गेल्यामुळे हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मुलायम सिंह यांना रुग्णलयात दाखल केल्यानंतर त्यांचे अनेक चाहते त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेत होते. त्यानंतर रविवारी रात्री समाजवादी पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत माहिती देण्यात आली. “माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव आयसीयूमध्ये दाखल आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे. आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया दवाखान्यात येऊ नका. माहिती तुम्हाला वेळोवेळी नेताजींच्या प्रकृतीची माहिती दिली जाईल." असे आवाहन समाजवादी पक्षाने केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अखिलेश यादव यांना फोन करून मुलायम यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही, मुलायम सिंह यांच्या तब्येतीची बातमी मिळाली, ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी कामना करतो.' असे ट्विट केले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मुलायमसिंह यादव हे आजारी आहेत. मात्र रविवारी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलायम यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी त्यांचे भाऊ शिवपाल, सून अपर्णा आणि प्रतीक हेदेखील रुग्णालयातच आहेत. राज्यभरातील समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते मुलायम सिंह यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.
'.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.