Amar Mulchandani News : ईडीच्या कामात अडथळा आणणाऱ्या मुलचंदांनी कुटुंबाची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Amar Mulchandani News : सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल मुलचंदांनी कुटुंबातील पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती
Amar Mulchandani
Amar Mulchandani Sarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : सेवाविकास को-ऑपरेटीव्ह बँकेतील ४३० कोटी रुपयांच्या बोगस कर्जवाटप आणि आर्थिक गैरव्यवहारातील आरोपी आणि या बँकेचे माजी अध्यक्ष अमर साधूराम मुलचंदांनी (Amar Mulchandani) यांच्या पिंपरीतील निवासस्थानी 'ईडी'ने परवा (ता.२७) छापा टाकला.

त्यावेळी त्यांच्या कारवाईत (सरकारी कामात) अडथळा आणल्याबद्दल मुलचंदांनी कुटुंबातील पाच जणांना पोलिसांनी काल रात्री अटक केली होती. त्यांची रवानगी आज पिंपरी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली.

अमर मुलचंदानीही या गुन्ह्यात आरोपी आहेत. मात्र, ते परवापासून रुग्णालयात दाखल असल्याने त्यांना त्यात अटक झाली नव्हती. त्यांचे बंधू अशोक, मनोहर त्यांच्या भावजयी दया, साधना आणि पुतण्या सागर यांना पिंपरी पोलिसांनी काल रात्री अटक केली होती. त्यांना आज सुट्टीतील पिंपरी न्यायालयात हजर करण्यात आले.

अमर यांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असून तो पुन्हा मिळवण्यासाठी तसेच त्यांच्याविरुद्ध इतर १७ गुन्हे असल्याने पोलिसांनी अधिक तपासासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. त्याला आरोपींचे वकील अॅड. आतिष लांडगे यांनी विरोध करीत ही खोटी केस असून ३५३ कलम लागू होत नसल्याचा बचाव केला.

तो न्यायालयाने ग्राह्य धरून पोलिसांची विनंती फेटाळून सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली. त्यामुळे आता त्यांच्या जामिनासाठी उद्या सत्र न्यायालयात अर्ज करणार असल्याचे अॅड.लांडगे यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

दरम्यान, ईडीच्या मुंबई (Mumbai) कार्यालयातील पथक मुलचंदानी यांच्या निवासस्थानातील दोन दिवसांची तपासणी संपवून काल परत मुंबईला गेले. त्यांनी गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे मुलचंदांनी कुटुंब तूर्तास त्यांच्या आणि मनी लॉंड्रिंगच्या कारवाईच्या कचाट्यातून वाचले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com