Shinde-Fadnavis-Pawar Govt: राज्यातील महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी आक्रमक; सरकारच्या 'या' निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

Kantrati Bharti : १६ तारखेला ठाण्यात महत्वाची बैठक, आंदोलनाची दिशा ठरवली जाणार...
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pimpri News : कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला सर्व विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केला आहे.आता त्याविरोधात राज्यातील महापालिका कर्मचारीही उतरले आहेत. त्यांच्या महाराष्ट्र राज्य मनपा कामगार - कर्मचारी संघटना फेडरेशनने या निर्णयाला विरोध करत त्या व इतर प्रश्नी १६ तारखेला ठाण्यात महत्वाची बैठक बोलावली आहे. त्यात आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Ajit Pawar News : 'पवारसाहेबांकडे का गेला होता?' अजितदादांनी योगेश ससाणेंना अक्षरश: घाम फोडला...

कर्मचाऱ्यांची नवीन भरती करण्याऐवजी रिक्तपदे कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या धोरणाला तीव्र विरोध असल्याचे फेडरेशनचे प्रमुख जनरल सेक्रेटरी कॉ.गणेश शिंगे सांगितले. लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारस हक्काच्या सरसकट नियुक्त्या मिळण्यासाठी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठीने दिलेल्या निर्णय़ावरील स्थगिती उठवण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न व्हावेत.

तसेच सातवा वेतन आयोग लागू न झालेल्या महापालिकेत तो करण्यात यावा, जेथे लागू केला आहे, तिथे फरकाची रक्कम त्वरित दिली जावी, महापालिका सेवेतील कंत्राटी कामगारांना कायम करावे, कंत्राटी पद्धत बंद करावी, सर्व महापालिकांतील सफाई कामगारांना घरे द्यावीत आदी इतर मागण्या असल्याचे फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांनी सांगितले.

या मागण्यांसाठी १६ तारखेच्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. झिंजुर्डे, शिंगेंसह फेडरेशनचे कार्याध्यक्ष अशोक जाधव (मुंबई), प्रवक्ते गौतम खरात, मधुकरराव बावस्कर (छत्रपती संभाजीनगर, मनपा), कॉम्रेड गणेश शिंगे, शैलेश कांबळे प्रसन्न अजित अवताडे (नांदेड वाघाळा मनपा) अखिल भारतीय सफाई काँग्रेस युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक (मुंबई), के.के. आंधळे, अशोक जानराव, बापूसाहेब सदाफुले (सोलापूर मनपा), कॉ. उदय भट, कॉ.प्रकाश जाधव (पुणे मनपा) आदी ठाण्य़ातील बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Edited By- Ganesh Thombare

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Malegaon Shivsena Politics: दादा भुसेंना घेरण्याची तयारी पूर्ण; त्यांच्या मतदारसंघात अद्वय हिरेंनी उघडले दुसरे कार्यालय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com