Muralidhar Mohol News : मुरलीधर मोहोळ यांचे दहा प्रश्न; पुणे आयुक्त कधी देणार उत्तरं...

Pune Municipality : मान्सूनपूर्व कामे 15 मे रोजीपर्यंत 90 टक्के पूर्ण झाल्याचे पुणे महापालिका प्रशासनाने म्हटले. परंतु या कामांवर मुरलीधर मोहोळ यांनी आक्षेप घेत महापालिकेचा दावा चुकीचा आणि दिशाभूल करणार आहे, असे म्हटले आहे.
Muralidhar Mohol
Muralidhar Moholsarkarnama

Pune News : लोकसभा निवडणुकांचे मतदान होताच माजी महापौर मुरलीधर मोहोळ पुण्यांमधील नागरी समस्यांवर कामाला लागलेत. मान्सूनपूर्व महापालिकेने केलेल्या 90 टक्क्यांचा कामांचा दावा चुकीचा आणि दिशाभूल करणारा वाटतो, असे म्हणत आयुक्तांना दहा प्रश्नांची उत्तर द्यावीत, असे मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.

पुणे महापालिकेने मान्सूनपूर्व कामे केली आहे. ही कामे 15 मे रोजीपर्यंत 90 टक्के पूर्ण झालीत. परंतु झालेल्या कामांवर मुरलीधर मोहोळ Muralidhar Mohol यांनी आक्षेप घेत महापालिकेचा दावा चुकीचा आणि दिशाभूल करणार आहे असे म्हटले आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे. पुणे शहर Pune City आणि उपनगरातील नाले सफाई आणि इतर कामे योग्यपद्धतीने झालेली नाहीत. झालेल्या कामांची पाहणी प्रशासन आणि आपण स्वतः संयुक्तपद्धती करू, असा म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्त राजेंद्र भोसले यांना निवेदन दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Muralidhar Mohol
Kolhapur Politics : कोल्हापुरात नवा पॅटर्न; बंटी पाटील, मालोजीराजे vs महाडिक, मुश्रीफ, क्षीरसागर

पावसाचे पाणी वाहून नेणारी पावसाळी गटारे आणि नाल्यांबाबत उपाययोजना? नालेसफाई अगोदर कामांची स्थिती? केंद्र सरकारने (Central government) अर्बन फ्लड रिस्क मॅनेजमेंटअंतर्गत निधी दिला होता, त्या योजनांतील कामांची सद्यस्थिती काय? पूरस्थिती निवारणासाठी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, पुणे पोलिस (Pune Police) , महामेट्रो, बीएसएनएल आदी विभागाची एकत्र बैठक घेऊन नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास खबरदारी म्हणून आदर्श कार्यप्रणाली एसओपी तयार केली आहे का?

आपत्तीला तोंड देण्यासाठी महापालिकेचा आपत्ती निवारण कक्ष सुसज्ज आहे का? आपत्ती निवारण कक्षात कोणकोणत्या सुविधा देण्यात आल्या आहेत आणि त्यांची सद्यस्थिती काय आहे?,असे पहिले पाच प्रश्न मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित केलेत. Muralidhar Mohol presentation on pre-monsoon preparations in Pune city and suburbs

आपत्ती व्यवस्थापनाच्या 432 कोटीच्या अहवालाची सद्यस्थिती काय?

पुण्यात संभाव्य पूरस्थितीचा विचार करून प्रभाग स्तरावर मदत केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे का? पाच वर्षांपूवी ढगफुटी सदृश पावसामुळे आंबिल ओढ्याला पूर आला होता. या परिसरात पूर नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना केल्यात? राज्य सरकारकडून सीमा भिंतींसाठी प्राप्त झालेल्या 200 कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या विकासकामांची सद्यस्थिती सांगा?

पुणे शहरातील पूरस्थितीचा विचार करून 128 ठिकाणांवरील उपाययोजनांचा आराखडा सी-डॅकच्या मदतीने तयार करून 432 कोटी रुपयांचा आपत्ती व्यवस्थापन कामांचा अहवाल राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास सादर करण्यात आला होता. त्याची सद्यस्थिती काय आहे? आणि पावसाळी कोंडीच्या 200 हून अधिक चौकांमध्ये कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत?, याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी मागितली आहे.

Muralidhar Mohol
Ajay Bhosle ON Surendra Agarwal: अजय भोसले वाचले, पण मित्राच्या छातीत गोळी शिरली! तेव्हा नेमकं काय घडलं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com