Assembly Elections News: महाराष्ट्रातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेसाठी काल(रविवारी) मतदान झाल्यानंतर आता दोन राज्यात आज (सोमवारी) मतदान होत आहे. निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानास सुरवात झाली आहे. मतमोजणी २ मार्चला होईल. (Meghalaya, Nagaland Assembly Elections news update)
नागालँड व मेघालय आणि नागालँडमध्ये विधानसभेसाठी आज मतदान होत आहे, विधानसभेसाठी दोन्ही राज्यात प्रत्येकी ६०-६० जागा आहेत. नागालँडमध्ये जुन्हेबोटो जिल्ह्यातील आकुलुटो जागेवर भाजप उमेदवार काजहेटी किन्मी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
तर मेघालयमध्ये एका उमेदवाराच्या निधनामुळे येथील निवडणूक रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता दोन्ही राज्यात ५९-५९ जागांसाठी मतदान सुरु झाले आहे.
मेघालयात ३६९ उमेदवारांपैकी ३६, नागालँड १८३ पैकी ४ महिला उमेदवार आहेत. सीमा वाद हा मेघालयात संवेदनशील मुद्दा आहे. या मुद्दावरुन निवडणुकीचा प्रचार सुरु होता. त्याचा परिणाम या निवडणूक दिसणार आहे.
भाजपने मेघालयातील सर्वच 60 विधानसभा जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर नागालँडमध्ये 2018 च्या निवडणुकीत NDPP (राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी) आणि भाजप यांच्यात 40:20 असा जागा वाटपाचा फॉर्म्युल्या ठरला होता. हा फॉर्म्युल्या पुढेही कायम ठेवण्यात आला आहे.
मेघालयात 2018 मध्ये 59 जागांवर निवडणूक झाली. काँग्रेसला सर्वाधिक २१ जागा मिळाल्या होत्या. भाजपला येथे केवळ 2 जागा मिळू शकल्या. नॅशनल पीपल्स पार्टीला (एनपीईपी) 19 जागा मिळाल्या.
पीडीएफ आणि एचएसपीडीपीने मिळून सरकार स्थापन केले. त्यांनी मेघालय डेमोक्रेटिक अलायन्स (MDA) ची स्थापना केली. गेल्या तीन महिन्यांपासून येथील पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसने 40 आणि एनपीपीने 58 उमेदवारांची यादी आधीच जाहीर केली आहे.
नागालँडमध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे सरकार आहे. नेफियू रिओ हे मुख्यमंत्री आहेत. NDPP 2017 मध्ये अस्तित्वात आला. 2018 मध्ये दोन्ही पक्षांनी निवडणूकपूर्व युती केली होती. त्यानंतर एनडीपीपीने 18 तर भाजपने 12 जागा जिंकल्या. यानंतर NDPP ने NPP आणि JDU सोबत सरकार स्थापन केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.