Sharad Pawar Greets PM Modi : व्यासपीठावर पोचताच शरद पवार अन॒ नरेंद्र मोदी रमले हास्यविनोदात...

PM Modi Lokmanya Tilak Award: शेजारी उभे असलेले माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हेही त्यात सामील झाले होते.
PM Modi Pune Visit
PM Modi Pune Visit Sarkarnama
Published on
Updated on

Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता. १ ऑगस्ट) लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमासाठी मोदी हे व्यासपीठावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात हास्यविनोद रंगला आणि कॅमेऱ्याने तो अचूकपणे टिपला. (Narendra Modi and Sharad Pawar on the same platform in Pune)

पुण्यातील एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येत आहे. त्यासाठी मोदी आज पुण्यात आहेत. मोदी हे व्यासपीठावर येण्याआधी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार (Sharad Pawar), सुशीलकुमार शिंदे, रोहित टिळक उपस्थित होते.

PM Modi Pune Visit
Shivsena on Sharad Pawar : ...तर शरद पवारांच्या नेतृत्वाला, हिमतीला सह्याद्रीने दाद दिली असती; पवारांच्या भूमिकेवर शिवसेनेची नाराजी

व्यासपीठावर पोचताच मोदी यांनी सर्वांशी हस्तांदोलन केले. पवारांशी हस्तांदेालन करताना दोघांमध्ये हास्यविनोद रंगला होता. शेजारी उभे असलेले माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हेही त्यात सामील झाले होते.

PM Modi Pune Visit
Opposition Leader of Vidhansabha: नाना पटोले, थोरात ,चव्हाणांना पुरून उरले ! विजय वडेट्टीवार खुर्च्चीत बसले

दरम्यान, मोदी यांनी पुण्यात पोचताच प्रथम दगडूशेठ हलवाई गणपतीला अभिषेक करून दर्शन घेतले. त्यानंतर मोदी हे एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर पोचले. दरम्यान, मोदी यांना पुरस्कार देण्याला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या लोकांनी विरोध केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com