NFAI News : पुण्याच्या सांस्कृतिक कोपऱ्यावर जावडेकरांनी हातोडा मारल्याचा आरोप का होतोय ; काय आहे प्रकरण ?

NFAI PUNE : माहिती व प्रसारण खात्याचे मंत्री असताना जावडेकर यांनी हा निर्णय घेण्यात आला होता.
NFAI PUNE new
NFAI PUNE new sarkarnama
Published on
Updated on

NFAI PUNE: चित्रपटासंबंधी काम करणाऱ्या सर्व संस्थाना एकाच छताखाली आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (एनएफएआय) राष्ट्रीय चित्रपट विकास संस्थेत (एनएफडीसी)विलीनीकरणाचा निर्णय घेतला होता.

भाजपचे नेते प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar)हे माहिती व प्रसारण खात्याचे मंत्री असताना हा निर्णय घेण्यात आला होता.

एनएफएआय-एनएफडीसीच्या विलिनीकरणात आता राजकारण सुरु झाले आहे. माजी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi)यांनी यावर टीका केली आहे. तर त्याला प्रकाश जावडेकरांनी प्रत्युत्तर दिले आहे.

विलिनीकरणाचा निर्णय पुण्याच्या सांस्कृतिक कोपऱ्यावर हातोडा मारणारा असल्याची टीका मोहन जोशी यांनी केली आहे.तर ‘एनएफएआय’चे काम पूर्वीप्रमाणेच चालू राहील, असा दावा प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.

NFAI PUNE new
Eknath Shinde : आता हे घ्या ; मिश्रांनी केला 45 नव्हे 48 जागांचा दावा ; शिंदे गटाची अडचण होणार ?

माहिती व प्रसारण खात्याचे मंत्री असताना जावडेकर यांनी हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार ‘एनएफएआय’सह फिल्म्स डिव्हिजन, डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल आणि चिल्ड्रन फिल्म सोसायटी या चार संस्था ‘एनएफडीसी’मध्ये विलीन करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली.

NFAI PUNE new
Ajit Pawar : ‘मास्टरमाईंड’ च्या चिथावणीनेच भाजपाचे आंदोलन ; अजितदादांचा रोख फडणवीसांकडे

यावर मोहन जोशी यांनी ‘एनएफडीसी’ ही फायदा मिळवणारी कंपनी असून त्यामध्ये या संस्थांचे विलीनीकरण झाल्यामुळे त्यांची स्वायत्तता आणि लोकाभिमुखता संपली असल्याची टीका आहे. ‘या सर्व संस्थांमधून पैसा मिळवणे, हेच ध्येयधोरण आता राबवले जाणार आहे. जावडेकर यांनी या निर्णयाला संमती दिली, परंतु त्यांना बहुदा हा विषय समजलाच नाही. या निर्णयामुळे वैभवशाली संस्थाना ओहोटी लागणार असून आम्ही त्याचा निषेध करतो,’असे जोशी यांनी सांगितले.

प्रकाश जावडेकर म्हणाले, "चित्रपट क्षेत्रासंबंधी सर्व संस्था एका छताखाली आणण्याच्या उद्देशाने व जनहितासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. विलिनीकरणामुळे काहीही बंद होणार नसून उलट या संस्थांची क्षमता वाढून अधिक चांगले काम होईल,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com