सतीश मगर क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष : शांतीलाल कटारिया उपाध्यक्ष

मगर व कटारिया यांची निवड २०२१ ते २०२३ या दोन वर्षांसाठी आहे.
satish magar.jpg
satish magar.jpg
Published on
Updated on

पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसाईक सतीश मगर यांची बांधकाम व्यावसायिकांच्या देश पातळीवरील क्रेडाई राष्ट्रीयचे चेअरमन म्हणून निवड करण्यात आली आहे. पुण्यातील आणखी एक बांधकाम व्यावसायिक शांतीलाल कटारिया यांची क्रेडाई राष्ट्रीयच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. क्रेडाई अर्थात काँफीडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही बांधकाम व्यावसायिकांची राष्ट्रीय स्तरावरील संस्था आहे. 


क्रेडाई पुणे मेट्रोचे काही सदस्य आणि पदाधिकारी आता राष्ट्रीय स्तरावरील काही समित्यांचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. यामध्ये सुहास मर्चंट (आकडेवारी आणि मानके), जे. पी. श्रॉफ (कौशल्य विकास) मनीष कनेरिया (पर्यावरण), आय. पी. इनामदार (कायदेशीर बाबी) या समित्यांचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील तर कपिल गांधी (जनसंपर्क आणि प्रसिद्धी) समितीचे सह-अध्यक्ष म्हणून काम करतील.


या विषयी बोलताना शांतीलाल कटारिया म्हणले, " क्रेडाई पुणे मेट्रो आणि महाराष्ट्रचे पदाधिकारी इतक्या मोठ्या प्रमाणात यापुढे क्रेडाई राष्ट्रीय साठी काम करणार आहेत ही महाराष्ट्रसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या याआधीच्या जवाबदाऱ्या अत्यंत चोखपणे पार पाडल्या आहेत ही बाब अधोरेखित होते. मला खात्री आहे कि यापुढेही हे सर्व पदाधिकारी क्रेडाई राष्ट्रीय साठी काम करताना नवे मापदंड प्रस्थपित करतील."
------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com