Nayana Pujari Rape And Murder Case : आरोपींच्या फाशीच्या शिक्षेवर पुढील महिन्यात सुनावणीची शक्‍यता

Nayana Pujari Rape And Murder Case : आरोपींना ठोठावलेली फाशीची शिक्षा कायम करण्यासाठी राज्य सरकारचा उच्च न्यायालयात अर्ज
Nayana Pujari Rape And Murder Case
Nayana Pujari Rape And Murder Case sarkarnama

Nayana Pujari Rape And Murder Case : संगणक अभियंता नयना पुजारी बलात्कार व हत्येनं एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणातील तीनही आरोपींना न्यायालयाने न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. आता या प्रकरणात मह्त्वाची माहिती समोर आली आहे. आरोपींच्या शिक्षा कायम करण्याच्या अर्जावर व निकालाविरोधात जानेवारीपासून मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, या प्रकरणात ऍड.हर्षद निंबाळकर यांची राज्य सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.

खराडी येथील सॉफ्टवेअर कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या नयना पुजारी (Nayana Pujari) 7 एप्रिल 2009 रोजी कार्यालयातील काम आटोपून रात्री आठच्या सुमारास घरी निघाली होती. घरी जाण्यासाठी ती खराडीच्या बस थांब्यावर बसची वाट पाहात थांबली होती. त्यावेळी तेथून कारमधून जात असलेल्या आरोपींनी तिला गाडीत बसवून वाघोली, तुळापूर, जेरेवाडी (ता.खेड) येथे नेले. तेथे तिच्यावर बलात्कार करुन तिचा खुन केला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या घटनेनंतर पोलिसांनी काही दिवसातच आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या.

Nayana Pujari Rape And Murder Case
Narendra Modi : मोदींची हत्या करा म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्याची आता सारवासारव...

नयना पुजारी हिच्यावर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी योगेश राऊत, महेश ठाकूर व विश्वास कदम या तिघांना पुण्याच्या विशेष न्यायालयाने मे 2017 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने तिन्ही आरोपींना खून, सामूहिक बलात्कार, अपहरण, जबरी चोरी, मृताच्या शरीरावरील ऐवज चोरणे, कट रचणे अशा सहा कलमांखाली दोषी ठरविले होते. विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी हा निकाल दिला होता.

Nayana Pujari Rape And Murder Case
Navneet Rana News: ज्यांनी योगदान दिले नाही; त्यांनी स्वप्न बघू नये, असे म्हणत राणांचा ठाकरेंना टोला...

या खटल्यातील आरोपींना ठोठावलेली फाशीची शिक्षा कायम करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात अर्ज केला आहे, तर तिन्ही आरोपींकडून या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपीले दाखल केली आहेत. त्यावर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या पीठासमोर जानेवारी महिन्यापासून सुनावणी सुरू होण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील निंबाळकर यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com