पुणे : केंद्रातील मोदी सरकारच्या (Modi Government) नाकर्तेपणामुळे अठरा पगड जातीतील ओबीसींचे हक्काचे आरक्षण हिरावले गेले आहे, असा आरोप करीत पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने (NCP) भारतीय जनता पार्टीचे (BJP) पुण्यातील खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले
मोदी सरकारने ओबीसी बांधवांच्या आरक्षणासाठी आवश्यक असलेला ‘इम्पिरिकल डाटा’ सादर न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केवळ महाराष्ट्रातील नवे तर देशभरात अनेक राज्यांतील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली आहे. मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी जानेवारी २०१४ मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात (UPA) सरकारने ओबीसी बांधवांचा ‘इम्पिरिकल डाटा’ स्वीकारून ओबीसी बांधवांचं आरक्षण अबाधित राखले होते.
२०१४ मध्ये देशातील जनतेला फसवून नरेंद्र मोदींचं सरकार सत्तेत आलं आणि इम्पिरिकल डाटामध्ये दोष आहेत असं कारण देत मोदी सरकारने ओबीसी आरक्षणाच्या वाटेत काटे पेरले. नरेंद्र मोदींच्या या कृतीमागे भाजपाची व संघाची (RSS) मनुवादी वृत्ती आहे.या देशातील ओबीसी बांधव, दलित बांधव प्रगती करत आहेत ही बाब भाजपाच्या मनुवाद्यांना नेहमीच खटकते. महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांचं आरक्षण स्थगित होण्यालाही भाजाप कारणीभूत आहे.
अवधूत वाघ नावाच्या एका इसमाने औरांगाबाद खंडपीठात ओबीसी आरक्षणाला आव्हान दिलं. हा अवधूत वाघ भारतीय जनता पक्षाचा राज्य सरचिटणीस आहे, राज्य प्रवक्ता आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, राज्यात भाजपाची सत्ता असतानाच भाजपाचा पदाधिकारी असलेल्या अवधूत वाघ याने ओबीसी आरक्षणाला आव्हान दिलं हा केवळ योगायोग नाही, हा भाजपने विचारपूर्वक रचलेला कट आहे. असे असतानाही भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी काल ओबीसी बांधवांबाबत खोटा कळवळा दाखवत आंदोलन केले.
ओबीसी बांधवांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तीव्र शब्दांत निषेध केला. हा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आज भाजपाचे खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. बापट हे संसदेचे सदस्य आहेत. दिल्लीत संसदेचे अधिवेशन सध्या सुरु आहे. खासदार बापट यांनी इम्पिरिकल डाटा जाहीर करण्याची मागणी संसदेत करावी, त्यात काय दोष आहेत तेही देशासमोर जाहीर करावे अशी मागणी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावेळी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.