Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

सातारा दौऱ्यात पवारांचं प्रचंड स्वागत; दीडशे वाहनांचा ताफा, यशवंतरावांच्या समाधीला अभिवादन !

Maharashtra NCP Crisis: पवार यांच्याबरोबर सुमारे सव्वाशे ते दीडशे गाड्यांचा ताफा आहे.
Published on

Pune News : राष्ट्रवादीतील फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज (सोमवारी) कराडच्या दिशेने रवाना झाले आहेत.त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, आमदार रोहित पवार हे आहेत.

कराड (Karad) येथे ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतील आणि पुन्हा एकदा आपल्या राजकीय वाटचाल आणि भूमिकांचा श्रीगणेशा करतील. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सुरुवातीला सकाळी त्यांचं स्वागत करण्यात आले. त्यानंतर पवार यांचा गाड्याचा ताफा सातारकडे रवाना झाला.

Sharad Pawar
Maharashtra NCP Crisis : निर्णय अजितदादांचा..,कोंडी निष्ठावंतांची ; शशिकांत शिंदे म्हणाले, 'सलोख्याचे संबंध तुटले..'

पवार यांच्याबरोबर सुमारे सव्वाशे ते दीडशे गाड्यांचा ताफा आहे. रस्त्यात जागोजागी त्यांचे प्रचंड स्वागत होत आहे. शिवापूर,कापूरहोळ शिरवळ,आनेवाडी आणि सातारा या ठिकाणी पवार यांचे प्रचंड मोठ्या गर्दीने स्वागत केलं.

रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि काही नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालीना वेग आलं.

अवघ्या दोन तासात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी आणि पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी वर्णी लावली.

अजित पवार यांना या बंडात पाठिंबा असणाऱ्या पक्षाच्या आमदारांची संख्या अजूनही गुलदस्त्यात आहे. काल (रविवारी) सकाळी ‘देवगिरी’ या अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे ३५ आमदार उपस्थित होते, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com