भाजप नेत्यांनी भेट घेऊनही नाथाभाऊंनी भाजपवर हल्लाबोल केलाच

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे गुरुवारी पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) दौऱ्यावर आले होते.
Eknath Khadse Criticizes BJP
Eknath Khadse Criticizes BJPSarkarnama

पिंपरी : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे गुरुवारी (ता.३ फेब्रुवारी) पिंपरी-चिंचवड भेटीवर आले होते. शहरात मूळचे खान्देशवासी मोठ्या संख्येने आहेत. तसेच नाथाभाऊंना मानणारा वर्गही मोठा आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या (Pcmc Election-2022) तोंडावरील त्यांच्या या दौऱ्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले गेले. यावेळी त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या कारभारावर सडकून टीका केली. सब मिल के खाओ असा त्यांचा हा कारभार गेल्या पाच वर्षात सुरु असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.(Eknath Khadse News)

Eknath Khadse Criticizes BJP
नाथाभाऊंच्या पिंपरी भेटीने राष्ट्रवादीला आले उसने अवसान..

भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खडसे प्रथमच पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. त्यात पालिका निवडणुकीच्या तोंडावर हा दौरा झाल्याने त्याला वेगळे महत्व प्राप्त झाले होते. त्यात त्यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक खान्देशवासी भाजपचे सभागृहनेते नामदेव ढाके तसेच, माजी सभागृहनेते तथा नगरसेवक एकनाथ पवार यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतल्याने मोठी चर्चा झाली. तरीही त्यांनी भाजपवर टीका केली. भाजपच्या भ्रष्टाचाराला पिंपरी-चिंचवड शहरातील जनता त्रस्त झाली आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे शहरात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच सत्ता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.(Eknath Khadse Criticizes BJP)

Eknath Khadse Criticizes BJP
किरीट सोमय्यांच्या भीतीने अनिल परबांनी मुरुडमधील जमीन विकली

खडसे म्हणाले, गेल्या पाच वर्षात भाजपची पिंपरी पालिकेत अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आली. त्यांच्या स्थायी समिती सभापती तथा अध्यक्षांना लाचखोरीत अटक झाली. तर, नुकतेच त्यांचे माजी उपमहापौर आणि नगरसेवक केशव घोळवे हे फसवणूक व खंडणीच्या गुन्ह्यात पकडले गेले. हे अटक होणे चांगले नाही. त्यातून शहराची बदनामी झाली आहे. परिणामी भाजपला सत्तेतून दूर करणे आवश्यक बनले आहे, असे खडसे म्हणाले. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या या भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरत जनतेसमोर मांडणार आहे. पिंपरीतील हा भ्रष्टाचार हा भाजपच्या वरिष्ठांचा आशिर्वाद असल्याशिवाय शक्य नाही. त्यामुळे त्याची व टेंडर प्रक्रियेची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. ज्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आऱोप झाले, तेच आज भाजपमध्ये पदावर आहेत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी खडसे यांची भेट घेतल्यावर भाजपचे काही नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. यास प्रत्युत्तर देतांना भाजप नेत्यांनी आगामी निवडणुकीत किमान 100 नगरसेवक हे भाजपचे निवडून येतील, असा दावा केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com