किरीट सोमय्यांच्या भीतीने अनिल परबांनी मुरुडमधील जमीन विकली

अनिल परब यांच्याएवढा खोटारडा मंत्री मी आत्तापर्यंत पाहिला नाही : किरीट सोमय्या
Anil Parab-Kirit Somaiya
Anil Parab-Kirit SomaiyaSarkarnama

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी २ मे २०१७ रोजी मुरुडमध्ये विभास साठे यांच्याकडून जमीन घेतली, त्याच दिवशी ती परबांच्या ताब्यात आली. साठे यांना एक कोटी दिल्याचा उल्लेख परब यांनी २०१८ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात केलेला आहे आणि आता म्हणतात माझा काय संबंध. सोमय्या घोटाळा काढतात; म्हणून २९ डिसेंबर रोजी सदानंद गंगाराम कदम यांना जागा विकली. मी माझ्या राजकीय जीवनात एवढा खोटा मंत्री मी आतापर्यंत बघितला नाही, अशा शब्दांत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मंत्री परब यांच्यावर हल्लाबोल केला. (Fearing Kirit Somaiya, Anil Parab sold the land in Murud)

सोमय्या हे मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, अनिल परब हे वेगवेगळे उद्योग करत आहेत आणि म्हणतात माझा काय संबंध. मी हिशेब देतो. वास्तविक पाहता अनिल परब यांनी विभास साठे यांच्याकडून जमीन घेतली. ती जमीन २ मे २०१७ रोजी परब यांनी ताब्यात घेतली. परब यांच्या २०१८ मधील निवडणूक प्रतिज्ञापत्रात १ कोटी रुपये साठे यांना दिल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि आता परब म्हणतात की माझा काय संबंध? अनिल परब तुम्ही मंत्री आहात, खोटे बोलून नोबेल मिळवायचे आहे का? तुम्हाला महाराष्ट्राला लुटायचं लायसन्स मिळणार आहे का?

Anil Parab-Kirit Somaiya
राऊतसाहेब हिशेब द्या; अन्यथा मी तुमचा हिशेब करेन : किरीट सोमय्यांचा निर्वाणीचा इशारा

अनिल परब यांचा रिसॉर्ट तयार झाला आहे. पश्चिमेस अरबी समुद्र असा उल्लेख आहे. परब यांनी त्याचा प्रॉपर्टी टॅक्सदेखील भरला आहे. तुमचा या रिसॉर्टशी काही संबंध नाही म्हणता तर महावितरणकडे विजेसाठी केलेल्या अर्जात तुमचा फोटो कसा? जर कोणी तुमच्या फोटो लावून अर्ज केला असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन तक्रार करा की, तुमचे उर्जामंत्री मला बदनाम करतायत म्हणून. महावितरणकडे थ्री फेज मीटरची मागणी करता. त्याचे पैसे भरता, इन्कम टॅक्समध्येदेखील नोंद आहे. त्यानंतर तुम्ही म्हणता रिसॉर्टशी माझा काय संबंध? असा खडा सवाल किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री परब यांना केला.

Anil Parab-Kirit Somaiya
भाजपचा उमेदवार ठरला; कोल्हापूर उत्तरमधून सत्यजित कदम निवडणूक लढवणार!

किरीट सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय करता आहात तुम्ही? एवढा खोटारडा मंत्री मी आतापर्यंत बघितलेला नाही. सोमय्या घोटाळा काढतात म्हणून २९ डिसेंबर रोजी सदानंद गंगाराम कदम यांना जागा विकली आहे. ही जागा त्यांनी ॲग्रीकल्चर लॅंड म्हणून विकली आहे. त्यासंदर्भात आम्ही लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. पर्यावरण सचिवांना १७ जून २०२१ रोजी पत्र लिहिले आहे. रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांनी रिपोर्ट पाठवला आहे. सीआरझेड आहे, तरीही रिसाॅर्ट बांधला आणि म्हणून रिसाॅर्ट पाडला आहे. आता मुख्यमंत्री ठाकरे अनिल परब यांचा राजीनामा कधी घेणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com