'जमां'च्या निधनाने शरद पवारांनी निष्ठावान सहकारी गमावला

शरद पवार यांनी मोरे यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले आहे.
Sharad Pawar & Jagannath More.
Sharad Pawar & Jagannath More.

निमगाव केतकी (इंदापूर) : इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जगन्नाथराव मारुती मोरे ( वय 88 वर्षे) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. 'ज.मा.आप्पा' या नावाने त्यांना ओळखले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते निष्ठावान सहकारी होते. 'जमां'च्या निधनानंतर पवारांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

जगन्नाथ मोरे यांचा शरद पवार यांच्या परिवाराशी त्यांचा 45 वर्षाचा जवळचा संबंध होता. निमगाव केतकीचे ते दहा वर्षे  सरपंच, जिल्हा परिषदचे पंधरा वर्षे  सदस्य, 1962 पासुन सलग बारा वर्षे इंदापूर पंचायत समितीचे सभापती होते. तसेच रेल्वे बोर्डवर व शेती महामंडळावर सदस्य म्हणुन व एस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणुन ही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सुना, नातवंडे, तीन भाऊ असा मोठा परिवार आहे. निधनाची बातमी समजताच गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले.

Sharad Pawar & Jagannath More.
मोठी बातमी : प्रियांका अन् राहुल गांधींसमोर भाजप सरकार झुकलं!

शरद पवार यांनी मोरे यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले आहे. याबाबतचे ट्विट पवारांनी केलं आहे. इंदापूर तालुक्यातील माझे धडाडीचे निष्ठावान सहकारी ज. मा. मोरे यांचे निधन मनाला चटका लावणारे आहे. जमांच्या शोकाकुल कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे.

पवारांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती

सभापती असताना मोरे यांनी गाव तिथं बारव व रस्ते ही योजना प्रभावीपणे राबविली होती. अभ्यासु व विनोदी शैलीच्या भाषणांमुळे त्यांच्या सभांना मोठी गर्दी असत. दुरदृष्टीचा नेता अशीही त्यांची तालुक्यात ओळख होती. शरद पवार हे मुख्यमंत्री असताना 1978 मध्ये त्यांच्या माध्यमातुन त्यांनी गावात ग्रामीण रुग्णालय, वीज उपकेंद्र व नळपाणी पुरवठा योजना राबवली.

त्यावेळी त्यांनी पवारांची गावातुन हत्तीवरुन काढलेली मिरवणुक खुप गाजली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कलेक्टर कचेरीवर निमगाव ते पुणे काढलेला पायी मोर्चा लक्षवेधी ठरला होता. 1980 मध्ये एस काँग्रेस कडुन व 1985 व 1990 मध्ये अपक्ष अशी तीन वेळा त्यांनी इंदापूर विधानसभेची निवडणुक लढवली होती. माञ, तिन्ही वेळेस त्यांना अल्पमताने यशाला हुलकावणी मिळाली होती. त्यांनी सार्वजनिक कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. सुवर्णयुग ट्रस्टचे विश्वस्त भारत मोरे हे त्यांचे पुञ होत.रवि व समीर हे नातु होत तर  रमेश, रामचंद्र  व गणपत मोरे हे त्यांचे बंधु होत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com