Sharad Pawar : असे किती दिवस चालणार ? ; पवारांकडून आगामी रणनीतीबाबत सुतोवाच

Baramati News : या सर्वांचा विचार आम्हा सर्व विरोधकांना एकत्र बसून करावा लागेल..
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati News : मोदी सरकार सत्तेचा गैरवापर करत विरोधकांवर सातत्याने खोटे गुन्हे नोंदविण्याचे प्रकार मागील काही महिन्यांपासून सुरु आहे. ज्यांना विचारांची लढाई विचारांनी लढता येत नाही ते पोलिसांना हाताशी धरून असे प्रकार करत असल्याचे टीका विरोधक करीत आहेत. (Sharad Pawar latest news)

भाजप सत्तेचा गैरवापर करून बळजबरीने आपली विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करत आहे.पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याची टीका होत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी भाष्य केलं आहे. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.

"विरोधकांना बोलू द्यायचच नाही, सभागृहात गोंधळ करायचा आणि त्या गोंधळातच विधेयक मंजूर करून घ्यायची, अशी सरकारची भूमिका असल्याचे चित्र समोर येत आहे, हे असे किती दिवस चालणार, हे समजत नाही. आता मात्र या सर्वांचा विचार आम्हा सर्व विरोधकांना एकत्र बसून करावा लागेल," अशा शब्दात शरद पवार यांनी येत्या निवडणुकीबाबतच्या रणनीतीबाबत सुतोवाच केले आहे. पवारांनी यावेळी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

Sharad Pawar
NCP : शिवनेरीवर पाय ठेवू देणार नाही ; राष्ट्रवादीच्या आमदाराचा शिंदे-फडणवीसांना सज्जड दम

"सत्तेचा गैरवापर देशात सर्वत्र होत आहे, हे वारंवार दिसत आहे. आजपर्यंत असे कधी पाहिले नव्हते. सत्ताधारी पक्षाने संसदेचा दर्जा कायम राखण्यासाठी पावले टाकले पाहिजेत, मात्र असे होताना दिसत नाही, माजी मंत्री अनिल देशमुख, नबाब मलिक, खासदार संजय राऊत यांना जी अटक झाली त्यातून सत्तेचा गैरवापर होत आहे, असेच चित्र पुढे येत आहे, "असे पवार म्हणाले.

Sharad Pawar
School bus accident : शालेय मुलींची बस ओढ्यात कोसळली ; बारामती जवळ तीन मुली गंभीर जखमी

शेतकरी ज्या दिवशी..

शरद पवार म्हणाले, "सत्ता कुणाची असली तरी देशाची अर्थव्यवस्था सुधारली पाहिजे आणि भारत हा एक उत्तम निर्यातदार देश म्हणून समोर यायला पाहिजे, राजकीय मतभेद बाजूला ठेवून अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करायला हवे. शेतकरी ज्या दिवशी यशस्वी होईल त्या दिवशी व्यापार आणि उद्योग या क्षेत्रात देशाला चांगले दिवस येतील,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com