`वैशाली नागवडेंना लगावलेली थप्पड भाजपला महागात पडणार`

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या कार्यक्रमात वैशाली नागवडे यांची निदर्शने
Vaishali Nagwade-Smriti Irani
Vaishali Nagwade-Smriti IraniSarkarnama

मुंबई : ‘‘भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली, त्यांना मारहाण केली. (BJP workers misbehave with women NCP leaders in Pune ) या घटनेचा धिक्कार असून, भाजपच्या पुरुष पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी यांना थप्पड लगावली आहेच, पण ही थप्पड महागाईचा सामना करणाऱ्या राज्यातील तमाम महिला वर्गाला लागलेली आहे,’’ अशी टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी मंगळवारी केली. (NCP leader Vidya Chavan slams BJP)

Vaishali Nagwade-Smriti Irani
Sarkarnama open mic : खासदार जलील यांना कठीण प्रश्न आणि त्यांची चपखल उत्तरे

त्या म्हणाल्या, ‘‘केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smruti Irani) पुण्यात आलेल्या असताना त्यांना महागाईबाबतचे निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष वैशाली नागवडे गेल्या होत्या. लोकशाही मार्गाने निवेदन द्यायला गेलेल्या ‘राष्ट्रवादी’ महिला पदाधिकाऱ्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली, त्यांचा विनयभंग करत श्रीमुखात भडकावली. या घटनेचा निषेध करत असताना विद्या चव्हाण म्हणाल्या की, महागाईबाबत बोलणे चूक आहे का, एकेकाळी तुम्हीच महागाईवर आकाशपाताळ एक केले होते, मग आज महागाईबाबतचे निवेदन तुम्हाला का नको? भाजपला याचा हिशोब द्यायला लागेल.’’

Vaishali Nagwade-Smriti Irani
छत्रपती संभाजीराजेंना महाविकास आघाडीचा धक्का : शिवसेना सहावा उमेदवार देणार

भाजपला जाब विचारू
भाजपने माफी मागितली नाही, तर राज्यात प्रत्येक ठिकाणी महागाईवर भाजपला जाब विचारला जाईल, असा इशारा चव्हाण यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये महागाई कमी करण्याचे स्वप्न दाखवून सत्ता हस्तगत केली. पण आता महागाई आकाशाला भिडली असताना मोदी आणि भाजप गप्प आहे. उलट सदाभाऊ खोत यांच्यासारखे नेते कुठे आहे महागाई, असा निर्लज्ज प्रश्न विचारत आहेत, अशा अशी टीकाही विद्या चव्हाण यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com