Ajit Pawar News: कोकाटेंच्या मंत्रिपदावरून राष्ट्रवादीत रस्सीखेच : अजितदादांच्या लाडक्या आमदाराला लाल दिवा मिळणार?

NCP MAL Sunil Shelke: माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रीपदावर कुणाची वर्णी लागणार याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

तळेगाव दाभाडे (पुणे) : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांना सदनिका गैरव्यवहारप्रकरणी कोर्टानं दोषी ठरवलं आहे. या प्रकरणामुळे त्यांचे मंत्रिपद गेले आहे. त्यांचे मंत्रिपद कुणाला मिळणार यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु आहे. मंत्रिपद कुणाला द्यायचे यावरुन पक्षामध्ये हालचालींना वेग आला आहे.

मावळचे आमदार सुनील शेळके यांनी भविष्यात मला मंत्रिपदाची संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. "२०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतरही मी मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी पूर्णतः तयार होतो,” असे सूचक वक्तव्य शेळकेंनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रीपदावर सुनील शेळके यांची वर्णी लागू शकते, अशी जोरदार चर्चा आहे. निवडणुकीनंतर मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने शेळके समर्थकांमध्ये नाराजी होती; मात्र सध्याच्या घडामोडींमुळे यावेळी संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. “अजितदादा मला आज ना उद्या नक्कीच मंत्रीपदाची संधी देतील,” असे शेळकेंनी स्पष्ट केले.

Ajit Pawar
Jalgaon Nagar Palika Result: महायुतीच्या होमग्राउंडवरच तीन मंत्री बाद! आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणं बदलणार

दरम्यान, बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका घेतल्याप्रकरणी न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवले असून, उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देत एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या निर्णयानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता असून, कोकाटे यांची आमदारकी रद्द होण्याचीही चर्चा आहे.

Ajit Pawar
Saurabh Tayde : शरद पवारांच्या पठ्ठ्यानं विदर्भात इतिहास घडवला! 21 वर्षीय तरुण बनला नगराध्यक्ष

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. मावळात तब्बल तीस वर्षांनंतर राष्ट्रवादीला सुनील शेळके यांच्या रूपाने आमदार मिळाला. सलग दुसऱ्यांदा ते निवडून आले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात. मावळसाठी सुमारे चार हजार कोटींचा विकासनिधी मिळवण्यात त्यांनी भूमिका बजावली आहे. तसेच वडगाव, तळेगाव व लोणावळा नगरपरिषदांमध्ये एकहाती सत्ता मिळाल्याने सुनील शेळके यांचे मंत्रीपद आता निश्चित मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com